रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाण्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 15:17 IST2018-04-13T12:07:13+5:302018-04-13T15:17:21+5:30
वेलचीची खासियत म्हणजे रोज वेलची खाल्ल्यास पुरुषांची शारीरिक कमजोरी आणि जाडपणा कमी होतो. चला जाणून घेऊया वेलचीचे फायदे....

रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाण्याचे फायदे
वेलची माऊथ फ्रेशनर ते खाद्य पदार्थांचा स्वाद वाढवण्याच्या कामात येते. यासोबतच याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. वेलचीची खासियत म्हणजे रोज वेलची खाल्ल्यास पुरुषांची शारीरिक कमजोरी आणि जाडपणा कमी होतो. चला जाणून घेऊया वेलचीचे फायदे....
जाडेपणा कमी होतो
जर तुमचं पोट वाढलेलं असेल आणि पोटाचा हा घेर कमी करायचा असेल तर रोज रात्री 2 वेलची खाऊन गरम पाणी प्या. यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटामिन B1, B6 आणि व्हिटामिन C शरीरातील अतिरीक्त चरबी कमी करतं. यात असलेल्या फायबर आणि कॅल्शिअममुळे वजन कमी करण्यात मदत होते.
पुरुषांची कमजोरी दूर होते
रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाणे पुरुषांसाठी चांगलं असतं. यामुळे पुरुषांची नपुंसकता हळूहळू दूर होते. वेलची गरम पाणी किंवा दूधासोबत घ्या.
ब्लडप्रेशर होतं कमी
वेलची ब्लड प्रेशर कमी करण्यातही उपयोगी आहे. यात पोटॅशिअम आणि फायबर अधिक प्रमाणात असतं जे ब्लड सर्कुलेशन योग्य प्रकारे करतं.
यूरिन इन्फेक्शनपासून सुटका
रोज वेलची खाल्ल्याने यूरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते.
पचनक्रिया चांगली होते
अनेकदा लोक भलतं सलतं खाऊन घेतात आणि त्यामुळे पोट खराब होतं. वेलचीमुळे या त्रासापासून सुटका मिळते.
केस मजबूत होतात
रोज रात्री 2 वेलची खाऊन पाणी प्यायल्याने केस आणखी मजबूत होतात. याने केस गळतीही थांबू शकते. केस अधिक काळे होतात.