झोपेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय?; हे असू शकतं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 04:03 PM2019-04-09T16:03:58+5:302019-04-09T16:05:36+5:30
तुमची झोप पूर्ण होत नाही का? किंवा तुम्हालाही झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागतो का? ही समस्या अनुवांशिक असू शकते.
तुमची झोप पूर्ण होत नाही का? किंवा तुम्हालाही झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागतो का? ही समस्या अनुवांशिक असू शकते. संशोधकांनी केलेल्या एका नव्या संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, आपल्या शरीराच्या अनेक भागांमध्ये अनुवांशिक कोड झोपेच्या समस्या निर्माण होण्यासाठी जबाबदार असतात. मेसाचुसेट्स जनरल हॉस्पिटल आणि एक्सेटर विश्वविद्यालयातील संशोधकांनी 47 अशा गोष्टी शोधल्या आहेत, ज्या आनुवांशिक कोड आणि झोपेचे गुणधर्म आणि वेळेशी संबंधित आहेत.
जीनोमिक क्षेत्रांमध्ये पीडीई 11 ए नावाचं जीन शोधण्यात आलं आहे. संशोधकांच्या समूहाने शोधून काढलं की, असाधारण आणि भिन्न प्रकारचे हे जीन्स फक्त झोपेची वेळ प्रभावित करत नाहीत. तर झोपेच्या गुणवत्तेवरही परिणाम करतात.
एक्सेटर विश्वविद्यालयाचे मुख्य लेखक सॅम्युएल जोन्स यांनी सांगितले की, हे संशोधन झोपेची विशेषतः प्रभावित करणाऱ्या अनुवांशिक फरकांची ओळख करण्यासोबतच माणसांच्या झोपेमध्ये आणविक भूमिका समजून घेण्यात नवा दृष्टिकोण प्रदान करतं.
याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत विश्वविद्यालयातील के ही एंड्र्यू वुड यांनी सांगितले की, झोपेची गुणवत्ता, प्रमाण आणि वेळेमध्ये बदल घडून आणल्यामुळे मनुष्य अनेक प्रकारचे आजार, डायबिटीज, लठ्ठपणा, मानसोपचार यांसारख्या समस्यांच्या विळख्यात अडकू शकतात.
जनरल नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनाच्या अहवालामध्ये संशोधकांनी यूके बायोबँकच्या जवळपास 85670 आणि इतर संशोधनांमधून जवळपास 5819 सहभागी लोकांचे आकडे एकत्रित केले. या सर्व लोकांनी आपल्या मनगटावर यंत्र बांधलं होतं. या यंत्रात्या सहाय्याने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात असेल.
यातून त्यांना असं आढळून आलं की, आनुवांशिक क्षेत्रांमध्ये झोपच्या गुणवत्तेचा संबंध आहे. याचबरोबर हे आनंद आणि सुख यांसारख्या भावानांशीही संबंधित होतं. सेरोटोनिन निद्रा चक्रामध्ये मुख्य भूमिका बजावत असून शांत आणि गाढ झोप मिळण्यासाठी मदत करते.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. या सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.