काय सांगता? केळींच्या सालीने वजन कमी होतं? जाणून घ्या कसं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 02:12 PM2019-12-07T14:12:10+5:302019-12-07T16:31:50+5:30
केळं सगळ्याच्याच घरी खातात. ऊर्जा निर्माण करण्यासाठी, ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किंवा थकवा येत असेल तर केळ्याचं सेवन केल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरतं.
केळं सगळ्याच्याच घरी खातात. ऊर्जा निर्माण करण्यासाठी, ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किंवा थकवा येत असेल तर केळ्याचं सेवन केल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरतं. केळ्याचे हे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. पण केळ्याची सालं देखील शरीरासाठी केळ्याइतकीच फायदेशीर ठरतात. आपण केळ खाल्ल्यानंतर साल फेकून देतो. पण ते साल फेकून न देता त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास चरबी घटवता येते. जाणून घ्या केळीच्या सालाने वजन कसे कमी करता येईल.
आहारतज्ञांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला केळ्यातील पोषक तत्त्वांचा फायदा मिळवायचा असेल तर केळ्याच साल खाणं सुध्दा तितकचं महत्त्वाचं आहे. केळ्याच्या सालीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतं. ऑस्ट्रेलिया येथील आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार केळ्याचं साल खाल्ल्यानंतर विटॅमिन बी6 आणि विटॅमीन शरीरास मिळतं.
केळीच्या सालीमध्ये शरीरास पोषक असे घटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे तुम्ही जर रोज एका केळीची साल खाल तर, एक महिन्यात तुमचे वजन २ ते ३ किलोंनी घटलेले दिसेल. ते सुद्धा कोणत्याही प्रकारचे अतिरीक्त कष्ट न घेता. सॉल्यूबल आणि इन्सॉल्यूबल असे दोन प्रकारचे फायबर केळीच्या सालीत असतात. जे शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करते.
याशिवाय केळ्याची साल हळुवार चेहऱ्यावर चोळल्यास चेहेऱ्यावरील मुरुमं पुटकुळ्या नाहीशा होण्यास मदत होते. तसेच सतत उन्हामध्ये वावरल्याने, जास्त मानसिक किंवा शारीरिक थकवा आल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. केळीच्या सालाने चेहऱ्यावर हळुवार मसाज केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.