अॅसिडिटी झटपट दूर करण्यासाठी सकाळी करा तुळशीचं सेवन, कसं ते वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 11:45 AM2020-03-05T11:45:39+5:302020-03-05T11:45:49+5:30
भारतीय घरांमध्ये तुळशीचं एक अनन्य साधारण महत्व आहे. तसेच तुळशीमध्ये अनेक औषधी गुणही आहेत. त्यामुळेच भारतीय घरांमध्ये तुळशीचं रोप बघायला मिळतं.
अॅसिडिटीची समस्या झाली की, व्यक्तीला दुसरं काही सुचत नाही. सतत पोटात गडबड होत राहते. मग अशात वेगवेगळे उपाय शोधण्याचा खटाटोप सुरू होतो. अनेकजण तर अॅसिडिटी दूर करण्याच्या टॅबलेट्स सोबत ठेवतात. पण आज आम्ही तुम्हाला अॅसिडिटी दूर करण्याचा एक नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. हा उपाय म्हणजे तुळशी. तुळशीच्या पानांनी तुम्ही झटपट अॅसिडिटी दूर करू शकता. चला जाणून घेऊ कशी....
भारतीय घरांमध्ये तुळशीचं एक अनन्य साधारण महत्व आहे. तसेच तुळशीमध्ये अनेक औषधी गुणही आहेत. त्यामुळेच भारतीय घरांमध्ये तुळशीचं रोप बघायला मिळतं. यातील औषधी गुण तर इतके प्रभावी आहेत की, एकापेक्षा जास्त समस्या फक्त तुळशीच्या रसाने दूर केल्या जाऊ शकतात. त्यातीलच एक म्हणजे अॅसिडिटी.
अॅसिडिटी दूर करण्यासाठी...
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी अनेकांच्या लाइफस्टाईलचा भाग असतात. कारण कामाच्या धावपळीत लोक वेळेवर आणि हेल्दी पदार्थ खाऊ शकत नाहीत. याने पोटाशी संबंधित समस्या होऊ लागतात. त्यातील एक समस्या म्हणजे अॅसिडिटी. अॅसिडिटी झाली की, सतत आंबट ढेकर येऊ लागतात, पोटात दुखतं आणि अस्वस्थता जाणवते. सोबतच याचा त्वचा, डोळे आणि संपूर्ण आरोग्यावरही प्रभाव पडतो.
अशात नैसर्गिक उपायाने अॅसिडिटी दूर करण्यासाठी तुळशीचं सेवन केलं जाऊ शकतं. तुळशी प्रभावी असण्यासोबतच सुरक्षितही आहे. कारण याचे सेवन करून कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत. तुळशी शरीरातील टॉक्सिन बाहेर फेकण्यास मदत करते. सोबतच पोटात एंजाइम्स तयार होण्याची प्रक्रियाही वेगाने होते. यानेच अॅसिडिटी कमी होऊ लागते.
कसं कराल सेवन?
तुळशीचं तुम्ही दोन प्रकारे सेवन करू शकता. एक म्हणजे अनोशा पोटी तुळशीची ५ ते ८ पाने चाऊन खा आणि पाणी प्या.
तर ज्या लोकांना अॅसिडिटी नेहमीच होते, त्यांनी रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत तुळशीच्या पानांचं सेवन करावं. यासाठी पाण्यात तुळशीची ४ ते ५ पाने बुडवून ठेवा. पाण्याच्या उष्णतेने पानांचा रस पाण्यात विरघळेल. या पाण्याने पोटाची समस्या लगेच दूर होईल.