वंध्यत्वावरील उपचार प्रणाली 'आयव्हीएफ' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 08:00 PM2019-03-11T20:00:51+5:302019-03-11T20:03:03+5:30

इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) सहायक प्रजनन थेरपीत वापरली जाणारी सर्वसामान्य पद्धत आहे, ज्यात गर्भारपणाच्या मदतीसाठी पुष्कळशा जटिल उपायांच्या शृंखला येतात.

Know the Infertility treatment and system 'IVF' | वंध्यत्वावरील उपचार प्रणाली 'आयव्हीएफ' 

वंध्यत्वावरील उपचार प्रणाली 'आयव्हीएफ' 

googlenewsNext

डॉ. अनघा कारखानीस (गायनॉकॉलॉजिस्ट)

इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) सहायक प्रजनन थेरपीत वापरली जाणारी सर्वसामान्य पद्धत आहे, ज्यात गर्भारपणाच्या मदतीसाठी पुष्कळशा जटिल उपायांच्या शृंखला येतात. जेव्हा एखाद्या जोडप्याला काही ठराविक वंध्यत्वाची समस्या असतात किंवा काही वेळा आनुवांशिक समस्या असतात तेव्हा आयव्हीएफचा वापर केला जातो. 

वंध्यत्वाच्या उपचारांत वयाचे महत्त्व असते. प्रजननक्षमता, पुरुष आणि महिलांमध्येही वयाप्रमाणे कमी होत जाते हे शारीरिक सत्य आहे. महिलात ३० वर्षे वयानंतर झपाट्याने कमी होते आणि ३५ वर्षे वयानंतर फारच कमी होते. अंडाशयात निर्माण होणाऱ्या बीजांडांची संख्या आणि प्रत दोन्ही कमी होतात. ज्यामुळे गर्भ राहण्याचा संभवही कमी होतो. पुरुषातील प्रजनन क्षमताही ४० वर्षे वयानंतर हळूहळू कमी होते पण हे थोडे हळू होते आणि बहुतेक पुरुष वयाच्या ५० व्या वर्षीही पिता होऊ शकतात. 

सरासरीत सुमारे ८५ टक्के जोडप्यांना प्रयत्न सुरु केल्यापासून एका वर्षात गर्भधारणा होते. जर बाळाची योजना करताना समस्या येत असतील तर हे मुख्य मूलभूत नियम लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो :

जर आपले वय ३५ वर्षांचे असेल तर एक वर्ष प्रयत्नानंतर व्यावसायिकाची मदत घ्या.

जर आपण ३५-४० वर्षांचे असाल तर सहा महिन्यांच्या प्रयत्नानंतर डॉक्टरांना भेटा.

जर आपण ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल, तर प्रजनन क्षमतेची संभवता प्रथमच तपासून घ्यावी. जर तसे केले नाही, तर तीन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर तज्ज्ञांची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो.

आयव्हीएफ उपचारांवर वयाचा जास्त प्रभाव पडू नये म्हणून आपण आणि आपल्या डॉक्टरांनी मिळून ही प्रक्रिया आपल्यावर यशस्वी होऊ शकते असे ठरविल्यानंतर लगेचच आपली आयव्हीएफ सायकल सुरु करण्याचा सल्ला दिला जातो. गर्भधारणेचा संभव जरी आपल्या खास बाबतीत पूर्णपणे परिस्थितिजन्य असला तरी काही गोष्टींमुळे गर्भधारणेचा संभव सुधारू शकतो.

हे उपाय करा

योग्य ते खा

आहारात आवश्यक फॅटी अ‍ॅसिड : सर्व चरबी वाईट नसते. ओमेगा ३ आणि ओमेगा ६ तेल जसे सैलॉन, सरडीन्स, हेरिंग्स आणि मॅकेरल सारख्या तेलकट माशांमध्ये आढळतात, ज्याची शरीराला गरजेच्या चरबीसाठी आवश्यकता असते. म्हणून त्यांना आपल्या आहारात समाविष्ट करा. शाकाहारी हे गोळ्याच्या स्वरूपात मिळवू शकतात.

ताजी फळे : फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. डाळिंबाचा रस, शुक्राणूंची प्रत वाढवितो आणि टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनास बढावा देतो.

हिरव्या भाज्या आणि दुग्ध उत्पादन : भाज्या आणि प्रथिनांनी भरपूर असलेला आहार, बीजाणू आणि शुक्राणूंची प्रत सुधारतो. पालेभाज्या, पनीर, जास्त खाल्ल्यास प्रथिने जास्त मिळतात आणि त्यामुळे गर्भधारणेचा संभव वाढतो. व्हिटॅमिन सी आणि जस्ताची पूरके घ्या आणि आपल्या आवडीची कोणतीही मल्टीव्हिटॅमिन घेतल्यास उत्तमच मदत होईल. हे उपचार, प्रजनन उपचार सुरू करण्यापूर्वी किमान ३ महिने आधीपासून घ्यावेत.

डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा :

यामध्ये भरपूर विश्रांती घेणे, योग्य खाणे आणि दिलेली औषधे वेळेवर घेणे येते.

ताणरहित राहा :

आयव्हीएफच्या ताणाचे, विश्रांती आणि निरोगीपणाकडे नेणारी कामे करुन संतुलन राखा. कारण जास्त ताण असल्यामुळे जीवनातील इतर ताण किमान राखण्याची काळजी घ्या.

ज्ञानी प्रजनन विशेषज्ञ निवडा :

हे सुनिश्चित करा की डॉक्टर पुनरुत्पादक औषधांमध्ये तज्ज्ञ आहेत. डॉक्टरांना आपल्याला मदत करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि समज असणे आवश्यक आहे.

योग्य वजन राखा : लठ्ठपणामुळे अंडकोषाच्या क्रियेत बाधा येऊन स्त्रियांवर परिणाम होतो. ज्या महिला कमी वजनाच्या आहेत त्यांना देखील अंडकोशांच्या समस्येची जोखीम वाढते ज्यामुळे वंध्यत्व होऊ शकते. प्रत्येकास योग्य बीएमआय राखून ठेवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे जेणेकरुन वंध्यत्व टाळता येईल. पुरुषांमधील लठ्ठपणा शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गतिशीलता प्रभावित करू शकतो. जास्त वजन हार्मोनमध्ये बदल घडविते ज्यामुळे वंध्यत्वाचे कारण होऊ शकते.

हे करू नका

काही ठराविक मासे खाणे टाळा : शार्क, मॅकरिल यासारखे काही ठराविक मासे उपचारांच्या पूर्ण काळात खाण्याचे टाळा कारण त्यात मर्क्युरी (पारा) जास्त प्रमाणात असतो आणि जो अपायकारक आहे.

नकारात्मक लोकांचे ऐकू नका : प्रत्येक जोडप्याची परिस्थिती आणि बाब वेगळी आहे. दुसऱ्या जोडप्याने यश मिळवले नसते, परंतु त्यांची परिस्थिति आपल्यासारखी नसू शकते.

धूम्रपान थांबवा : पुरुष आणि महिला दोघांनीही धूम्रपान केल्यास प्रजननाचा संभव कमी होतो. महिलांमध्ये धूम्रपानामुळे अंडाशय म्हातारे होते आणि बीजाणूंचा पुरवठा कमी होतो. ह्यामुळे गर्भपतनाचा संभवही वाढतो. पुरुषांत धूम्रपानामुळे शुक्राणूंची संख्या आणि प्रत कमी भरते कारण त्यात शुक्राणू डीएनएचे विखंडन वाढविते.

Web Title: Know the Infertility treatment and system 'IVF'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.