लठ्ठपणा दूर करून तुमची स्लिम फिगरची इच्छा पूर्ण करेल कमळाची काकडी, जाणून घ्या फायदे! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 10:32 AM2020-02-11T10:32:34+5:302020-02-11T10:39:12+5:30

कमळाचे वेगवेगळे प्रकार असतात त्यातील पोयसर कमळास चपटे फळ येते. त्यांत पांच सहा बिया असतात. त्यांस कमलाक्ष किंवा कमळ- काकडी म्हणतात.

Know Kamal Kakdi health benefits | लठ्ठपणा दूर करून तुमची स्लिम फिगरची इच्छा पूर्ण करेल कमळाची काकडी, जाणून घ्या फायदे! 

लठ्ठपणा दूर करून तुमची स्लिम फिगरची इच्छा पूर्ण करेल कमळाची काकडी, जाणून घ्या फायदे! 

Next

कमळाचे वेगवेगळे प्रकार असतात त्यातील पोयसर कमळास चपटे फळ येते. त्यांत पांच सहा बिया असतात. त्यांस कमलाक्ष किंवा कमळ- काकडी म्हणतात. कमलाक्षाच्या काशीकडे लाह्या करतात. या कमळाच्या काकडीचे आरोग्यासाठी अनेक फायदेही असतात. कमळाची काकडी, मूळ यांचा वापर भाजी आणि स्नॅक्स म्हणूनही केला जातो. खासकरून हिवाळ्यात कमळाच्या काकडीचा लोक आनंद घेतात. आज आम्ही तुम्हाला कमळाच्या काकडीचे आरोग्याला होणारे फायदे सांगणार आहोत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, कमळाच्या काकडीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सचं भरपूर प्रमाण असतं. त्यामुळे याचा आहारात समावेश करावा. याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. याने वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून आणि डायबिटीसपासून बचाव होतो.

डायजेशन चांगलं होतं

(Image Credit : santacruzayurveda.com)

कमळाच्या काकडीमध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतं. हे फायबर आपली डायजेशन सिस्टीम साफ ठेवण्यास आणि त्याची क्रिया अधिक चांगली करण्यास फायदेशीर ठरतं. जेव्हा डायजेशन सिस्टीम साफ होते तेव्हा मेटाबॉलिज्म आपोआप मजबूत होतं. याने आपल्याला एनर्जेटिक वाटतं. 

लठ्ठपणा होतो कमी

कमळाच्या काकडीचा डाएटमध्ये समावेश करणारे लोक लठ्ठपणाचे शिकार होत नाहीत, असे बोलले जाते. याचं कारण आहे यातील फायबर्स आणि मेटाबॉलिज्म बूस्ट करण्याची क्षमता. ज्या लोकांचं मेटाबॉलिज्म फास्ट असतं, त्यांच्यात फॅट वाढण्याचा धोका फारच कमी असतो.

व्हिटॅमिन्सचा खजिना

न्यूट्रिएंट्स भरपूर असलेल्या कमळाच्या काकडीमध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असतं. यात पोटॅशिअम आणि आयर्नही भरपूर प्रमाणात असतं. याने आपली त्वचा आणि हाडे हेल्दी राहण्यास मदत मिळते. पोटॅशिअम आपल्या शरीरात सोडिअमचं प्रमाण रेग्युलेट करून ब्लड प्रेशरला मॅनेज करण्याचं काम करतं. याने शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहतो. तसेच तुम्हाला हाय बीपीची समस्याही होत नाही.

तणाव होतो कमी

कमळाची काकडी खाल्ल्याने आपला स्ट्रेस मेंटेन करण्यासही मदत मिळते. एक्सपर्ट सांगतात की, कमळाच्या मूळांमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतं जे एक पॅरीडॉक्सीन कंपाऊंड असतं. आणि याने मेंदूत न्यूरल रिसेप्टर्ससोबत संपर्क करतं. याने न्यूरल रिसेप्टर्स कमी होतात. ज्या लोकांना सतत डोकेदुखीची समस्या राहते किंवा जे नेहमी चिडचिड करतात असा लोकांनी कमळाची काकडी नियमितपणे खावी. 


Web Title: Know Kamal Kakdi health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.