इतकी फिट अन् फाइन आहे मंदिरा बेदी; जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 01:05 PM2019-09-06T13:05:41+5:302019-09-06T13:10:19+5:30

आपल्या वाढणाऱ्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो, हे तर आपम सर्वचजण जाणतो. जसं वय वाढतं तसं मेटाबॉलिज्मपासून सगळ्या गोष्टींची प्रक्रिया संथ गतीने होऊ लागते. त्यामुळे अनेक आजार बळावण्याचा धोका वाढतो.

Know the mandira bedi fitness secret after the age of 40 | इतकी फिट अन् फाइन आहे मंदिरा बेदी; जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य

इतकी फिट अन् फाइन आहे मंदिरा बेदी; जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य

Next

आपल्या वाढणाऱ्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो, हे तर आपम सर्वचजण जाणतो. जसं वय वाढतं तसं मेटाबॉलिज्मपासून सगळ्या गोष्टींची प्रक्रिया संथ गतीने होऊ लागते. त्यामुळे अनेक आजार बळावण्याचा धोका वाढतो. यापासून बचाव करण्यासाठी स्वतःला फिट ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला 43 वर्षांच्या मंदिरा बेदीच्याफिटनेस टिप्स अत्यंत फायदेशीर ठरतील. 

न्यूट्रिशन मंत्र

मंदिरा बेदी आपल्या डाएटमझदून कधीच शरीराला पोषक तत्व देणारे पदार्थ बाहेर काढत नाही. ती साखरेपासून, भाजी, फ्रुट्स आणि आपल्या आवडीच्या प्रत्येक गोष्टीचा आहारात समावेश करते. पण या सर्व पदार्थांचे प्रमाण ती मर्यादेत ठेवते. मंदिराने सांगितल्यानुसार, अनेकदा ती स्वतःचं वजन वाढू देते आणि आपलं वर्कआउट आणि डाएट प्लॅनच्या मदतीने पुन्हा घटवते. 

इंटरमिटेंट फास्टिंग

मंदिराही आपलं इंटरमिटेंट फास्टिंगला फॉलो करते. ज्यामध्ये ती 16 तासांचा उपवास करते आणि उरलेल्या 8 तासांमध्ये पोषक आहार घेते. मुंबई मिररशी बोलताना मंदिराने सांगितले की, ती आता स्वतःच्या मूडनुसार आहार घेत नाही. जेव्हा तिला खरचं भूक लागते तेव्हाच ती खाते. 

फास्टिंगनंतर मंदिरा सर्वात आधी फ्रुट, ग्रीक योगर्ट आणि नट्स खाते. त्यानंतर तिच्या दोन मील्समध्ये अंडी, डाळ, भाजी आणि सलाड असतं. तसेच ती रात्रीचं जेवण 8 वाजण्याच्या आधीच घेते. 

मेंटल हेल्थ

फिजिकल हेल्थसोबतच ती स्वतःची मेंटल हेल्थही सांभाळते. तिने सांगितलं की, आता ती सर्वांच्या आधी स्वतःकडे लक्ष देते आणि इतरांच्या आनंदाच्या आधी स्वतःचा आनंद कशात आहे, हे लक्षात घेते. तिने सांगितलं की, सोशल मीडियामुशे ती कोणत्याही नकारात्मक गोष्टीमुळे प्रभावित होत नाही. कारण तिला माहित आहे की, कोणतीही गोष्ट कशी हॅन्डल केली पाहिजे. ती आपले पॉझिटिव्ह व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करते. त्यामुळे तिला समोरूनही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो. 

वर्कआउट

मंदिरा बेदी प्रत्येक दिवशी आपलं वर्कआउट प्लॅन चेजं करते. शरीराला एक्सरसाइजची सवय लागू नये हा त्यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो. ती जास्त वजन उचलण्याऐवजी कार्डियो एक्सर्साइजवर फोकस करते. तिने सांगितलं की, ती एका दिवसामध्ये एकाच बॉडी पार्टवर लक्ष केंद्रित करते. जर जिममध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ नाही मिळाला तर ती घरीच 45 मिनिटांचं वर्कआउट करते. जिममधून ब्रेक घेण्यासाठी ती स्विमिंग करते किंवा 10000 स्टेप्स चालते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपा. करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Know the mandira bedi fitness secret after the age of 40

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.