तुम्हाला माहित आहे का 'ऑईल पुलिंग' म्हणजे काय? अनेक आजारांवर आहे रामबाण, जाणून घ्या आत्ताच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 03:28 PM2021-08-22T15:28:22+5:302021-08-22T15:30:02+5:30

ऑईल पुलिंग म्हणजे काय आणि शरीराच्या समस्या दूर करण्यासाठी त्याचा वापर कसा करू शकतो ते जाणून घेऊया.

know oil pulling and benefits of oil pulling | तुम्हाला माहित आहे का 'ऑईल पुलिंग' म्हणजे काय? अनेक आजारांवर आहे रामबाण, जाणून घ्या आत्ताच

तुम्हाला माहित आहे का 'ऑईल पुलिंग' म्हणजे काय? अनेक आजारांवर आहे रामबाण, जाणून घ्या आत्ताच

googlenewsNext

आपल्या चुकीच्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. यामुळे अनेक प्रकारच्या समस्याही निर्माण होतात. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यांचे सतत सेवन केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही नैसर्गिक आणि हर्बल पद्धतींचा अवलंब करू शकता. अशीच एक पद्धत म्हणजे ऑईल पुलिंग.ऑईल पुलिंग म्हणजे काय आणि शरीराच्या समस्या दूर करण्यासाठी त्याचा वापर कसा करू शकतो ते जाणून घेऊया.

ऑईल पुलिंग म्हणजे काय?
ऑईल पुलिंग ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे. ज्यात शरीराच्या समस्या दूर करण्यासाठी विविध प्रकारचे तेल वापरले जाते. यामध्ये तिळाचे तेल, सूर्यफूल तेल आणि नारळाचे तेल वापरले जाते. ही सर्व तेले मिसळून तोंड धुवून त्यानंतर ब्रश केले जाते. यासाठी तुम्हाला सकाळी नाश्त्याच्या २० ते २५ मिनिटे आधी हे करावे. लक्षात ठेवा की, ऑईल पुलिंगच्या वेळी तेल गिळू नका. काही काळ तोंडात तेल हलवा आणि नंतर स्वच्छ धुवा. त्यानंतर ब्रश करा.

ऑईल पुलिंगचे फायदे
ऑईल पुलिंगसाठी सर्वोत्तम वेळ ही सकाळची असते. आयुर्वेदात देखील सकाळी रिकाम्या पोटी ऑईल पुलिंग करण्यास सांगितले आहे. हा उपाय केल्याने तोंडात असलेले जीवाणू आणि जंतू चांगले स्वच्छ होतात. नियमितपणे वापरल्यास, ते तोंडाची दुर्गंधी, हिरड्या सुजणे, दातदुखी, डोकेदुखी आणि त्वचेला मॉइश्चराइज करण्यास मदत करते.

ऑईल पुलिंगच्या वेळी ही खबरदारी घ्या
ऑईल पुलिंगच्या वेळी चुकूनही तेल गिळू नका. कारण त्यात भरपूर बॅक्टेरिया असतात जे शरीराला हानी पोहोचवू शकतात. नेहमी शुद्ध तेल वापरा. लहान मुलांनी ऑईल पुलिंग करणे टाळले पाहिजे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तेलाची अ‍ॅलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करू नका.

Web Title: know oil pulling and benefits of oil pulling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.