कमी ऐकू येतंय का? 'हे' असू शकतं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 12:09 PM2018-07-27T12:09:43+5:302018-07-27T12:10:08+5:30
बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. त्यातील एक समस्या म्हणजे बहिरेपणा. ही समस्या अनेक लोकांना लहानपणापासून असते.
बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. त्यातील एक समस्या म्हणजे बहिरेपणा. ही समस्या अनेक लोकांना लहानपणापासून असते. तर काही लोकांना अपघातामुळे होते. बऱ्याचदा आपल्या दुर्लक्षामुळेही लोकांना ही समस्या होत असून जास्त मोठ्या आवाजात गाणी ऐकणं, मोबाईलचा जास्त वापर करणं तसेच जास्त आवाज असलेल्या परिसरात राहिल्यामुळेही ही समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त शरीरात काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही बहिरेपणाचा त्रास होऊ शकतो. जाणून घेऊयात कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे बहिरेपणाची समस्या उद्भवते...
'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होते बहिरेपण
आरोग्य चांगले राखण्यासाठी व्हिटॅमिन्स आणि अन्य पोषक तत्वांची गरज असते. यांपैकी कोणत्याही घटकांच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे शरीरात व्हिटॅमिन सी, ई आणि डी ची कमतरता असेल तर बहिरेपणाची समस्या होऊ शकते. त्यामुळे या समस्येपासून वाचण्यासाठी आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि डी युक्त आहाराचा समावेश करावा. याव्यतिरिक्त तुम्ही काही घरगुती उपायांनीही बहिरेपणाच्या समस्येपासून सुटका करू शकता.
1. मोहरीचे तेल आणि तुळस
मोहरीच्या तेलामध्ये तुळशीची पानं टाकून गरम करावी आणि थंड झाल्यावर त्याचे काही थेंब कानामध्ये टाकावे.
2. मोहरीचे तेल आणि धने
मोहरीच्या तेलामध्ये काही धन्याचे दाणे टाकून तेल गरम करावे. हे गरम तेल थंड करून त्यानंतर त्याचे काही थेंब कानात टाकावे.
3. कांदा
बहिरेपणापासून सुटका मिळवण्यासाठी पांढऱ्या कांद्याचा रसही फायदेशीर ठरतो.
4. हिंग आणि दूध
दूधात चिमुटभर हिंग घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि त्याचे काही थेंब कानात टाकल्यास आराम मिळेल.
5. लसूण आणि मोहरीचे तेल
मोहरीच्या तेलात लसणाच्या 7-8 पाकळ्या टाकून त्या काळ्या होईपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर गाळून तेल थंड करा. आणि दररोज काही थेंब कानात टाका.
6. बेलाची पानं आणि डाळिंबाची पानं
यासाठी 1-1 चमचा बेल आणि डाळिंबाच्या पानांचा रस घ्या. त्याला 100 ग्रॅम मोहरीच्या तेलामध्ये कढवून घ्या. त्यानंतर ठंड करून काही थेंब कानामध्ये टाका.
टिप : हे सर्व उपया करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.