सुदृढ राहण्यासाठी फक्त मॉर्निंग वॉक करु नका; जाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत, तरच होईल आरोग्याला फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 03:23 PM2021-10-07T15:23:57+5:302021-10-07T15:30:08+5:30
आपण दररोज चालायला हवे, कारण असे केल्याने व्यक्तीचा लठ्ठपणा, डायबिटीस, पोटावरील चरबी आणि हृदयरोगाचा धोका कमी करू शकतो. पण या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि शरीर सुदृढ करण्यासाठी केवळ चालणेच नव्हे, तर योग्य प्रकारे चालणे आवश्यक आहे.
शरीराला तंदुरुस्त आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी तसेच विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व आरोग्य तज्ज्ञ हाच सल्ला देतात की, आपण दररोज चालायला हवे, कारण असे केल्याने व्यक्तीचा लठ्ठपणा, डायबिटीस, पोटावरील चरबी आणि हृदयरोगाचा धोका कमी करू शकतो. पण या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि शरीर सुदृढ करण्यासाठी केवळ चालणेच नव्हे, तर योग्य प्रकारे चालणे आवश्यक आहे.
तुम्हाला कदाचित माहित नसेल की, चालण्याची ही एक पद्धत असते, परंतु बहुतेक लोक माहिती अभावी चुकीच्या पद्धतीने चालतात, ज्यामुळे त्यांना चालण्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.
त्यामुळे आम्ही आज तुम्हाला चालण्याची योग्य पद्धत कोणती? हे तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे जर तुम्ही अजूनही चुकीच्या प्रकारे चालत असाल तर योग्य प्रकारे चालून शरीराला याचा फायदा होऊ द्या.
ब्रीदिंग, मॉबिलिटी आणि माइंड-बॉडी कोच डाना सँटस (Dana Santas) यांनी सांगितले की, लोक चालताना शरीराचे संतुलन सांभाळत नाहीत. ज्यामुळे त्यांच्या शरीराची स्थिती बिघडते आणि गुडघे, कंबर, पाय इत्यादींमध्ये वेदना होत असल्याच्या तक्रारी ते करतात.
बहुतेक लोक शरीराच्या एका बाजूला झुकून चालतात किंवा नेहमी बॅग हँग करण्यासाठी, मोबाईल धरण्यासाठी किंवा वस्तू उचलण्यासाठी हाताचा वापर करता, ज्यामुळे तुम्ही मोकळ्या हाताने किंवा मोकळेपणाने चालत नाही.
फिटनेस कोचच्या मते, चालताना आणि दोन्ही हात स्विंग करताना तुम्ही नेहमी शरीर सरळ ठेवावे. चालताना दोन्ही हात पुढे मागे सरकलेच पाहिजेत. पण लक्षात ठेवा की जेव्हा तुमचा एक हात समोर असेल तेव्हा दुसरा हात मागे असावा. म्हणजे दोन्ही हात एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरले पाहिजेत. तसेच चालण्याच्या या पद्धतीसोबतच चालण्याच्या काही आणखी महत्त्वाच्या टिप्सही लक्षात घेतल्या पाहिजेत.
जसे की,
1.जर तुम्हाला वॉकला जाताना मोबाईल किंवा बॅग नेण्याची सवय असेल तर चालताना, फक्त एकाच हातात बॅग किंवा मोबाईल न पकडता. दुसऱ्या हाताचा किंवा खांद्यांचा वापर थोड्या थोड्या वेळाने बॅग उचलण्यासाठी आणि मोबाईल किंवा इतर काही वस्तू उचलण्यासाठी केला पाहिजे.
2. काही महिन्यांनंतर, आपल्या शूजचे तळवे तपासा. कारण, एका बाजूला झुकून चालल्याने तुमचा एक शूज अधिक झिजतो. ज्यामुळे शरीराच्या एका बाजूला जास्त ताण पडतो. जर तुमच्या पायाचे कोणतेही शूज खूप झिजलेले असतील तर ते शूज बदला.
3. शरीराचे संतुलन सुधारण्यासाठी, तज्ज्ञ सिंगल लिंब यूनीलेटरल एक्सरसाइज (Single limb Unilateral Exercise) करण्याची शिफारस करतात. ज्यामुळे शरीराचे संतुलन सुधारते तसेच पाय मजबूत होतात.