उपाशीपोटी ग्रीन टी प्यायलात तर आयुष्यभर सोसावे लागतील गंभीर परिणाम, जाणून घ्या कधी प्यावी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 03:07 PM2021-09-21T15:07:34+5:302021-09-21T15:21:50+5:30

काही लोक दिवसातून अनेक वेळा ग्रीन टी पितात. मात्र, ग्रीन टी ३ कपांपेक्षा जास्त पिणे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते.

know the right time to drink green tea, also how much green tea you should drink | उपाशीपोटी ग्रीन टी प्यायलात तर आयुष्यभर सोसावे लागतील गंभीर परिणाम, जाणून घ्या कधी प्यावी?

उपाशीपोटी ग्रीन टी प्यायलात तर आयुष्यभर सोसावे लागतील गंभीर परिणाम, जाणून घ्या कधी प्यावी?

googlenewsNext

वजन कमी करण्यासाठी अनेकजण ग्रीन टी पितात. हा चहा सर्वात कमी प्रक्रिया करून बनवला जातो. तसेच ग्रीन टी अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. ज्यामुळे आपण निरोगी राहतो आणि आपले रोगांपासून संरक्षण होते. काही लोक दिवसातून अनेक वेळा ग्रीन टी पितात. मात्र, ग्रीन टी ३ कपांपेक्षा जास्त पिणे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन लिटरेचर रिव्ह्यूच्या मते, ग्रीन टी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर पाणी गरम करा. त्यानंतर त्यामध्ये ग्रीन टी मिक्स करा. यानंतर ते झाकून ठेवा. साधारण पाच मिनिटे तसेच राहु द्या आणि त्यानंतर ग्रीन टी गरम-गरम प्या.

ग्रीन टीचे आहारात किती प्रमाण असावे?
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल आणि कॅफीन असते. एका दिवसात ३ कप पेक्षा जास्त ग्रीन टी प्यायल्याने रात्री झोप येण्यास त्रास होऊ शकतो. ग्रीन टीमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. ज्यामुळे शरीरातील आवश्यक पोषक घटक बाहेर येतात. रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ दिवसा असते.

आपण जेवणाच्या २ तास आधी किंवा नंतर ग्रीन टी पिऊ शकता. जेवणानंतर ग्रीन टी प्यायल्याने पोषक घटकांचे प्रमाण कमी होते आणि लोह आणि खनिजे शोषण्यास अडथळा निर्माण होतो. ज्या लोकांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) आहे त्यांनी ग्रीन टीचे सेवन करू नये.

ग्रीन टी पिण्याचे फायदे
1. ग्रीन टी प्यायल्याने फुफ्फुसे, कोलन, तोंड, पोट, आतडे, मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि मेमरी ग्रंथीचा कर्करोग यासह इतर आजार टाळण्यास मदत होते. हे आपले चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

2. यात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे, जीवनसत्त्वे समृद्ध आहे. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यात असे गुणधर्म आहेत जे हृदयाशी संबंधित रोग टाळण्यास मदत करतात.

3. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते आणि टाइप -२ मधुमेहाचा धोका देखील कमी करते. हे जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते. जे त्वचा तजेलदार करण्यास मदत करते आणि स्ट्रोक आणि डायरिया सारख्या चयापचय रोग कमी करते.

 

 

 

Web Title: know the right time to drink green tea, also how much green tea you should drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.