जाणून घ्या मिलिंद सोमणच्या फिटनेस  मागचं रहस्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 02:50 PM2019-12-17T14:50:28+5:302019-12-17T14:54:11+5:30

सुपरमॉडेल, अभिनेता, उद्योजक मिलिंद सोमण नेहमीच चर्चेत असतो. दरवेळी फिटनेसची काठिण्यपातळी अधिकाधिक उंच नेताना दिसतो.

know the secret behind Milind Soman's fitness | जाणून घ्या मिलिंद सोमणच्या फिटनेस  मागचं रहस्य 

जाणून घ्या मिलिंद सोमणच्या फिटनेस  मागचं रहस्य 

Next

सुपरमॉडेल, अभिनेता, उद्योजक मिलिंद सोमण नेहमीच चर्चेत असतो. दरवेळी फिटनेसची काठिण्यपातळी अधिकाधिक उंच नेताना दिसतो. प्रवासादरम्यान पौष्टिक खाद्यपदार्थ खाण्याचा पर्याय निवडण्याचा आग्रह अशा कितीतरी गोष्टींमुळे आज पन्नाशी पार केलेला मिलिंद सोमण अनेकांचे प्रेरणास्थान आहे. तेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत असाल किंवा केवळ एक अधिक निरोगी जीवनशैली जगण्याची इच्छा बाळगून असाल तर तुमच्यासाठी खुद्द फिटनेसच्या क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्तीने म्हणजे मिलिंद सोमणने तुमच्यासाठी दिलेले हे  फिटनेस मंत्र  नक्की वाचा.


 

आपल्या दिवसाची सुरुवात बदाम खाऊन करा.


 

दर दिवशी सकाळी मूठभर बदाम खाऊनच माझ्या दिवसाची सुरुवात होईल याची मी काळजी घेतो, गेली कित्येक वर्षे बदाम हा माझ्यासाठी ब्रेकफास्टच्या आधी तोंडात टाकायचा आवडीचा पदार्थ राहिला आहे. कारण बदाम म्हणजे प्रथिने, ई जीवनसत्व, मॅग्नेशियम इत्यादी महत्त्वाच्या पोषक घटकांचा चांगला स्त्रोत आहे, जे आरोग्यासाठी चांगले आहे. त्याचबरोबर बदामामुळे ऊर्जाही मिळते त्यामुळे माझा दिवस उत्साहात सुरू होतो असे मिलिंद सोमण सांगतात.


सकारात्मकतेला जवळ करा

आठवड्याचे काही तास एखाद्या प्रकारच्या शारीरिक व्यायामासाठी वेगळे काढण्याबरोबरच जीवनशैलीमध्येही जाणीवपूर्वक बदल घडवून आणणेही महत्त्वाचे आहे. जिथे शक्य असेल तिथे लिफ्टच्या ऐवजी पाय-यांचा वापर करा, भाजीपाला खरेदी करायचा असेल तर गाडीने जाण्याच्या ऐवजी चालत जा, वेळ असेल जवळपासच्या अंतरावर जाण्यासाठी सायकल वापरा आणि दोन जेवणांच्या मध्ये भूक लागते तेव्हा बदाम, मखणा किंवा त्या त्या मोसमातील फळे असे सकस पर्याय निवडा. माझ्याबाबतीत सांगायचे, तर मला फार वेळ एका जागी स्थिर बसण्याची सवयच नाही. 


भरपूर आराम करा 

आहार आणि झोप या दोन्ही गोष्टी आपले आरोग्य राखण्यासाठी अत्यावश्यक आहेतच, पण व्यायामाचा अपेक्षित परिणाम मिळण्यासाठीही त्या महत्त्वाच्या आहेत.  माझ्यासाठी योग्य प्रमाणात झोप मिळणे ही माझ्या प्राधान्यक्रमातील प्रथम क्रमांकाची गोष्ट आहे! आजकालच्या जगामध्ये आपले जग चहुबाजूंनी स्क्रीन्सनी वेढले गेले आहे. ही स्क्रीन हातातून सोडणे, बंद करणे आणि झोपी जाणे अनेकांना कठीण वाटते. पण आपल्या मेंदूला आणि शरीराला हवा असलेला आराम देण्यासाठी, आपल्या संपूर्ण क्षमतेनिशी काम करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये आणि दिवसाच्या वेळापत्रकामध्ये ही शिस्त आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 
धूम्रपान बंद करा 

दिवसाला ३० सिगारेटी ओढण्याचा अनुभव एकेकाळी मीही घेतलाय त्यामुळे धूम्रपान सोडणे किती कठीण काम आहे हे मला माहीत आहे. पण मी हे असाध्य साध्यही केले आहे आणि माझ्यासारख्या व्यक्तीला स्वानुभवावरून इतके नक्की सांगता येईल की, हे व्यसन सोडण्यासाठी केलेले प्रयत्न तसूभरही वाया जाणार नाहीत. धूम्रपानामुळे तुमचा स्टॅमिना, तुमची विचार करण्याची पद्धत यांवर परिणाम होतो. आयुष्य पुरेपूर जगण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. मी धावायला सुरुवात केली तेव्हा मला ही गोष्ट उमगली. हे व्यसन थांबवायला मला ३ वर्षे लागली पण अखेर मी त्यात यशस्वी ठरलो. धूम्रपान सोडणे ही तुम्ही तुमच्या आरोग्याला दिलेली सर्वोत्तम भेट ठरेल.

Web Title: know the secret behind Milind Soman's fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.