या 6 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, असू शकतो ब्रेन ट्यूमर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 11:08 AM2018-07-28T11:08:58+5:302018-07-28T11:09:24+5:30
आकडेवारीवर नजर टाकली तर भारतात दरवर्षी 40 ते 50 हजार लोकांना ब्रेन ट्यूमरचं निदान होतं. यात सर्वात जास्त लहान मुलं शिकार होतात.
अलिकडे लोक वेगवेगळ्या आजारांबाबत सतर्क राहू लागले आहेत. पण असेही काही आजार आहेत ज्याबाबत लोकांमध्ये अजिबात जागरूकता नाही. त्या ब्रेन ट्यूमरसारख्या आजाराचा लोक अंदाजही घेऊ शकत नाही. आणि जेव्हा याची माहिती मिळते तेव्हा बराच वेळ निघून गेलेला असतो. आकडेवारीवर नजर टाकली तर भारतात दरवर्षी 40 ते 50 हजार लोकांना ब्रेन ट्यूमरचं निदान होतं. यात सर्वात जास्त लहान मुलं शिकार होतात.
एक्सपर्टनुसार, ट्यूमरचे लक्षण त्याच्या लोकेशनवर निर्भर असतात. जर ट्यूमर मेंदूच्या त्या भागा असेल ज्याद्वारे तुमचे डोळे आणि हात-पाय कंट्रोल होतात तर व्यक्तीच्या त्या अंगांमध्ये कमजोरी येऊ शकते. चला जाणून घेऊ ब्रेन ट्यूमरची आणखी काही लक्षणे..
सतत होणारी डोकेदुखी
बहुदा असे मानले जाते की, डोकेदुखी ट्यूमरचं सुरुवातीचं लक्षण आहे. पण डोकेदुखी ही मोठ्या ट्यूमरमुळे होते. ही ट्यूमरची स्टेज नाहीये.
चालता चालता अचानक झटका येणे
हे कोणत्याही प्रकारच्या ट्यूमरचं सुरुवातीचं लक्षण असतं. डोक्यात असलेल्या ट्यूमरमुळे न्यूरॉन अनियंत्रित होतात. त्यामुळे व्यक्तीची हालचाल असामान्य होते. अशावेळी पूर्ण शरीरासोबत शरीराच्या एखाद्या अंगाला झटके जाणवू शकतात.
अचानक बॅलन्स बिघडणे
जर तुम्ही एखादी वस्तू निट उचलू शकत नसाल, पायऱ्यांवर व्यवस्थित चढू वा उतरु शकत नसाल, तुमचा तोल जात असेल तर हे संकेत घातक आहे. बोलताना चेहऱ्यावरील हावभाव कंट्रोल न करु शकणे हाही याचाच भाग आहे.
शरीराचा एखादा भाग सुन्न होणे
जर तुमच्या शरीराचा एखादा भाग सुन्न पडत असेल किंवा तुम्हाला काहीच जाणवत नसेल तर याबाबत तुम्ही लगेच काहीतरी करायला हवे. जेव्हा ट्यूमर स्टेम(तो भाग जो मेंदूला पाठीच्या कण्याशी जोडतो) मध्ये असतो. तेव्हा ही समस्या होते.
स्मरणशक्ती कमजोर होणे
ट्यूमरमुळे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तित्वामध्ये बदल होतो. ज्या लोकांना ट्यूमर असतो त्यांची स्मरणशक्ती कमी होते. ते गोष्टी विसरू लागतात. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिडचिड होते.
डोळ्यांसमोर धुसर दिसणे
धुसर दिसणे किंवा डबल दिसणे किंवा प्रकाश नाहीसा होणे हे ट्यूमरची लक्षणे आहेत. तुम्हाला काही चिन्हही दिसू शकतात.