काय आहेत अॅक्टीव्ह थायरॉइडची लक्षणं, कशी घ्याल काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 03:52 PM2019-12-14T15:52:03+5:302019-12-14T16:03:22+5:30
सध्याच्या काळात अनियमीत खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांना तसंच तरूणींना जीवघेणे आजार उद्भवत आहेत.
सध्याच्या काळात अनियमीत खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांना तसंच तरूणींना जीवघेणे आजार उद्भवत आहेत. मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार कमी वयात होत आहेत. झोप न येणे, थकल्यासारखं वाटणं, एकाग्रता कमी होणं, सतत नैराश्य येणे. तुम्हालाही या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्वरीत वैद्यकीय तपासणी करणं गरजेच आहे. ही लक्षणं अंडर अॅक्टिव्ह थायरॉईडची असू शकतात.
मानेच्या खालच्या भागात असलेल्या एडम्स अॅपलच्या मागच्या बाजूला फुलपाखराचा आकार असलेली ग्रंथी असते. त्या ग्रंथीला थायरॉईड ग्लँड असे म्हणतात. त्या भागात संतुलन बिघडल्याने हा आजार उद्भवतो. थायरॉईडच्या समस्येमुळे अचानक वजन कमी होऊ शकतं. किंवा वाढू सुध्दा शकतं. सर्वाधिक समस्या ही ओव्हर अॅक्टिव्ह थायरॉईड ग्रंथी म्हणजे हायपर थायरॉईडिझममुळे होते. जाणून घ्या थायरॉईडची लक्षणं.
(Image credit- BBC)
मासिक पाळीत अनियमितता,
अशक्तपणा, तंद्री, शक्ती गमावणे,
अचानक मूडमध्ये बदल,
गळ्याला तसेच हाता-पाय सूज येणे,
अचानक वजन वाढणे,
अन्न पचण्यासाठी त्रास होणे,
कोरडी त्वचा पडणे,
केस गळणे,
भारतात १३ टक्के महिला या हायपोथायरॉइडच्या आजाराने ग्रस्त आहेत. राहणीमानाच्या पध्दतीत बदल करून थॉयरॉईडच्या जाळ्यातून मुक्तता होऊ शकते. व्यवस्थीत झोप घेणे, व्यायाम करणे, योगा करणे. अशा पध्दतीने आरोग्याची काळजी घेतल्यास आरोग्य उत्तम राहील.
झोप पूर्ण घ्या -
(Image credit- the conversation)
हाइपोथायरॉडिज्म हा आजार झोपेत असताना मेंदुला प्रभावित करतो. या आजारापासून वाचण्यासाठी नियमीतपणे झोप घेणे गरजेचे आहे. ७-८ तास रोज झोप घेतल्यास शरीर ताजेतवाने राहील. तसेच आजारांपासून संरक्षण करता येईल.
संतुलीत आहार
आजारापासून मुक्त राहण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. आहार सकारात्मक बदल केल्याने मानसिक ताणतणाव कमी होतो. त्यामुळे रोजच्या जेवणात ताजी फळं, भाज्या, दूध, पनीर , कडधान्य यांचा समावेश करा.
व्यायाम करा
(Image credit- KUTV)
दररोज व्यायाम केल्याने शरीर लवचीक राहील, त्यामुळे लठ्ठपणा उद्भवणार नाही. कारणं वजन वाढल्याने थायरॉईड होण्याचा धोका अधिक असतो.