वारंवार जुलाब होत असल्यास असू शकतात 'हे' गंभीर आजार, आजच द्या लक्ष नाहीतर पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 12:24 PM2021-08-04T12:24:30+5:302021-08-04T13:52:15+5:30
जुलाब झाल्यावर काय त्रास होतो, हे या विकाराचा सामना करणाऱ्या प्रत्येकालाच माहीत आहे. अक्षरश: शरीर गळून पडते, काहीही खावेसे वाटत नाही.. त्यामुळे जुलाब नको रे बाबा! असेच रुग्ण म्हणतो. जाणून घेऊया जुलाब झाल्यावर काय उपाय करावेत...
जुलाब झाल्यावर काय त्रास होतो, हे या विकाराचा सामना करणाऱ्या प्रत्येकालाच माहीत आहे. अक्षरश: शरीर गळून पडते, काहीही खावेसे वाटत नाही.. त्यामुळे जुलाब नको रे बाबा! असेच रुग्ण म्हणतो. जाणून घेऊया जुलाब झाल्यावर काय उपाय करावेत...
दिवसातून कितीवेळा मलविर्सजन होणे म्हणजे जुलाब?
मलविसर्जन वारंवार होणे किंवा मल पातळ असतो, तेव्हा जुलाब झाले असे म्हटले जाते. मनुष्य निरोगी असेल, तर मलाचा घट्टपणा ठरावीक असतो. मलविसर्जन दिवसातून बहुधा एकदा किंवा दोनदा होते. मात्र जुलाब झाल्यावर मलाचा पातळपणा वाढतो. दिवसातून अनेकदा मलविसर्जनासाठी जावे लागते. दिवसातून ५ पेक्षा जास्तवेळा मलविर्सजन झाल्यास त्यास जुलाब म्हणतात.
जुलाब होऊ द्या, कारण जुलाब होणे गरजेचे
तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. कोणत्याही व्यक्तीला जुलाब होणे गरजेचे आहे. कारण, जेव्हा जुलाब होतात तेव्हा आपल्या शरीरातील सर्व घाण साफ होते. विशेषकरून आतड्यात जमलेली घाण जुलाब झाल्यामुळे बाहेर पडते. त्यामुळे जुलाब होणे गरजेचे आहे.
- जुलाब झाले असतील तर ते थांबण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. त्यातच एक म्हणजे केळे खायला सांगितले जाते. जुलाब झाल्यावर कमीतकमी ३ केळी घ्यावीत व ती चावून खावीत.
- केळे खाल्ल्यानंतर १ छोटा पॅकेट इसबगोल घ्या आणि त्यात २५० ग्रॅम दही मिसळून खा. बस्स! तुमचे जुलाब बंद होतील आणि पोट एकदम मस्त होईल. हा जुलाब थांबवण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. कधीही औषधाशिवाय जुलाब थांबविण्यासाठी हा उपाय नक्की वापरा.
- जुलाब थांबवण्याचा आणखी एक उपाय आहे चहा. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. चहा जुलाब थांबविण्याचे काम करते. फक्त तुम्हाला इतकेच करायचेय की जितक्या प्रमाणात चहा घ्याल तितक्याच प्रमाणात पाणी घ्या अन् प्या.
- या शिवाय तुम्ही हवे असल्यास एक चमचा चहापत्ती घ्या आणि ती गिळा. त्यावर थोडे पाणी प्या. जुलाब आपोआप थांबतील