लिव्हर सिसोरिसच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ओढावू शकतो मृत्यू, आत्ताच घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 02:39 PM2021-08-17T14:39:03+5:302021-08-17T17:04:33+5:30

आजकाल लिव्हर सिसोरिसचं प्रमाण वाढत आहे.आपल्या नियमित जीवनातील काही वाईट सवयींमुळे यकृताचे कार्य बिघडते. परिणामी आरोग्यावर काय परिणाम होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

know the symptoms, causes, remedies cure of liver cirrhosis | लिव्हर सिसोरिसच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ओढावू शकतो मृत्यू, आत्ताच घ्या जाणून

लिव्हर सिसोरिसच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ओढावू शकतो मृत्यू, आत्ताच घ्या जाणून

googlenewsNext

यकृत हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. यकृतामुळे शरीराचे पचन सुरळीत राहण्यास मदत होते. सोबतच शरीरात पित्ताचं प्रमाण संतुलित ठेवणं, रक्त स्वच्छ ठेवणं, शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. पण आपल्या नियमित जीवनातील काही वाईट सवयींमुळे यकृताचे कार्य बिघडते. परिणामी आरोग्यावर काय परिणाम होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 

यकृताच्या आरोग्यावर परिणाम झाल्यानंतर संबंधित टिश्यू खराब होतात. हळूहळू यकृताशी निगडीत अनेक समस्या वाढायला सुरूवात होते. यामध्ये लिव्हर कॅन्सर, लिव्हर अ‍ॅबसेस,फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिसचा त्रास जडू शकतो. आजकाल लिव्हर सिसोरिसचं प्रमाण वाढत आहे. 

लिव्हर सिरोसिस म्हणजे काय ?
कॅन्सरनंतर सगळ्यात गंभीर आजार म्हणजे लिव्हर सिरोसिस. लिव्हर सिरॉसिसच्या शेवटच्या टप्प्यात त्यामधून बचावण्याचा एक मार्ग म्हणजे यकृताचं प्रत्यारोपण. जेव्हा यकृताचे टिश्युज नष्ट होतात तेव्हा ही समस्या जडायला सुरूवात होते. यामध्ये लिव्हरचा आकार असामान्य होण्यास सुरूवात होते. अशा परिस्थितीमध्ये पोर्टल हायपरटेंशन वाढण्यास सुरूवात होते. 

लिव्हर सिरोसिसचे तीन टप्पे 
लिव्हर सिरोसिसचा आजार हा तीन टप्प्यांमध्ये वाढतो. प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळी लक्षण आढळतात.  

पहिला टप्पा
लिव्हर सिरॉसीसमध्ये पहिल्या टप्प्यात वजन कमी होणं, थकवा जाणवनं, पचन बिघडणं अशा समस्या जाणवतात. 

दुसरा टप्पा 
उलटी होणं, भूक मंदावणं, ताप येणं, चक्कर येणं  

अंतिम आणि तिसरा टप्पा 
अंतिम टप्प्यात अनेकदा रक्ताची उलटी होणं, लहानशा जखमेतूनही भळाभळा रक्तप्रवाह होणं, शुद्ध हरपणं अशी लक्षणं दिसतात. लिव्हर सिरोसिसच्या या टप्प्यात यकृत प्रत्यारोपणाशिवाय इतर पर्याय नाही.

लिव्हर सिरोसिसची कारणं

  • लीवर सिरोसिस हा आजार होण्याची अनेक कारणं आहेत. यात मद्यपान, हेपिटायटिस बी आणि सी याशिवायही अनेक कारणं आहेत.
  • यकृतातील चरबीचे प्रमाण अति होणे
  • काही औषधे  अति काळ सेवन केल्याने सिरॉसिस होऊ शकतो.
  • जन्मजात लिव्हरमधील दोष- पित्त नलिकेत जन्मजात अडथळा असेल तर सिरॉसिस होऊ शकतो.
  • लठ्ठपणा 
  • मधूमेह 

लिव्हर सिरोसिसची लक्षणे
या आजारामुळे शरीरात नेहमी थकवा जाणवत असतो. तसेच भूक कमी लागते आणि त्वचेचा रंग फिकट पिवळा होऊ लागतो. कावीळ होते, खाज येणं, लठ्ठपणा आणि त्वचेचा रंग निळाही (bruising) होऊ शकतो.  लीवर सिरोसिसमुळे पोटात, जांघेत, पायात आणि टाचात सतत सूज आल्यासारखं वाटतं. यासोबतच यात varices समस्याही निर्माण होतात. यात नसांमध्ये सूज येते आणि रक्ताभिसरण सुरळीत होत नाही. लीवर बायोप्सीच्या (liver biopsy) मदतीने सिरोसिस आजाराचं निदान होतं. यात रुग्णाचा वैद्यकिय इतिहास, रक्ताची चाचणी याच्या आधारावर सिरोसिसचं निदान करता येतं.

कसा टाळाल धोका? 

लिव्हर सोरासिसचा धोका टाळायचा असेल तर खाण्या-पिण्यासोबतच तुमच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करा. 
दारू किंवा सिगारेटचं व्यसन असल्यास त्याचा मोह टाळा. आहारात गाजर, फळं, शिंगाडा, दूध, सोयाबिनचा समावेश करा. संतुलित आणि पोषक आहाराचा समावेश केल्यास यकृताचं आरोग्य जपण्यास मदत होते. वरील लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता डॉक्टरचा सल्ला घ्या.

 

 

 

Web Title: know the symptoms, causes, remedies cure of liver cirrhosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.