तुमचे पाय देतात तुम्हाला धोक्याचे संकेत, पायांवरील 'या' लक्षणांवरुन वेळीच ओळखा 'हे' गंभीर रोग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 05:43 PM2021-11-07T17:43:52+5:302021-11-07T17:47:42+5:30
मधुमेह (Diabetes), थायरॉईड, गँगरीन, संधिवात आणि हृदयविकार (Heart Problems) पायात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून ओळखता येतात. आपल्याला ही लक्षणं जाणवल्यास आजार वाढण्यापासून थांबविला जाऊ शकतो.
तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण पायावरूनही (Feet) आपल्या आरोग्याची स्थिती काय आहे हे ओळखता येऊ शकते. मधुमेह (Diabetes), थायरॉईड, गँगरीन, संधिवात आणि हृदयविकार (Heart Problems) पायात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून ओळखता येतात. आपल्याला ही लक्षणं जाणवल्यास आजार वाढण्यापासून थांबविला जाऊ शकतो.
सुजलेले पाय
पायांना सूज येणं हे मूत्रपिंडाच्या (किडनी) आजाराचे किंवा अशक्तपणाचे लक्षण असू शकते. दुसरीकडे, जर पायाच्या वेगवेगळ्या भागात वेदना किंवा सूज दिसली तर ते संधिवात किंवा हृदयाशी संबंधित आजारांमुळे देखील असू शकते. सांधेदुखीमध्येही पायाच्या अंगठ्याला सूज येऊ शकते. जर पायाच्या बोटावर लाल पट्टे दिसले तर ते हृदयाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते.
पायात मुंग्या येणे
पायांना मुंग्या येणं हे उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तातील साखरेचे लक्षण असू शकते. या स्थितीत रक्ताभिसरण बिघडते, त्यामुळे पायात मुंग्या येतात. शरीरात व्हिटॅमिन ई आणि डीच्या कमतरतेमुळे पायांना मुंग्या येऊ शकतात. मधुमेहामुळेही पायाच्या अंगठ्याला सूज येऊ शकते. मधुमेहामुळेही टाचदुखी होऊ शकते. दुसरीकडे, पायांमध्ये कोरडेपणा थायरॉईड रोगाचे लक्षण असू शकते.
पायांचा रंग बदलणे
जर पायांचा रंग बदलत असेल तर ते गॅंग्रीनमुळे असू शकते. हा जीवाणूजन्य आजार शरीरात योग्य रक्ताभिसरण न झाल्यामुळे होऊ शकतो.
बोटे जाड होणे
पायाची बोटे जाड होणे हे आतड्याच्या आजाराचे लक्षण आहे. हे फुफ्फुसाच्या कर्करोगात आणि हृदयविकारामुळे देखील हे होऊ शकते. जर तुमच्या पायाचे बोट किंवा अंगठा नेहमी दुखत असेल तर ते शरीरात जास्त प्रमाणात युरीनचे लक्षण आहे. यामुळे शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी वाढते.
पाय दुखणे
जर तुमचा संपूर्ण पाय दुखत असेल तर ते खराब रक्ताभिसरणामुळे असू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यावर संपूर्ण पायात वेदना होतात आणि सांधेदुखीचा त्रासही होतो. याशिवाय जर शरीरात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पोटॅशियम किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तरी पाय दुखू शकतात.