घशातील वेदना असू शकतो थायरॉईड कॅन्सरचा संकेत, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 12:23 PM2020-04-22T12:23:08+5:302020-04-22T12:30:42+5:30

थायरॉईड ग्रंथी घश्यात असतात. त्यातून शरीरासाठी आवश्यक असलेले हार्मोन्स रिलिज होत असतात. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईड कॅन्सरचा धोका जास्त असतो.

Know the symptoms of thyroid cancer myb | घशातील वेदना असू शकतो थायरॉईड कॅन्सरचा संकेत, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

घशातील वेदना असू शकतो थायरॉईड कॅन्सरचा संकेत, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

googlenewsNext

दैनंदिन जीवन  जगत असताना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत असतात. अनेक समस्यांकडे वेळीच लक्ष दिल्यामुळे त्यांचं रुपातंर मोठ्या आजारात होतं. घश्यात सूज येणं, खाताना किंवा पित असताना अन्न गिळण्यासाठी त्रास होणं. अशा समस्यांना साधारण समस्या समजून अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. जर तुम्हाला ही समस्या दीर्घकाळपर्यंत उद्भवत असेल तर कॅन्सरचं लक्षणं सुद्धा असू शकतं. थायरॉईड ग्रंथी घश्यात असतात. त्यातून शरीरासाठी आवश्यक असलेले हार्मोन्स रिलिज होत असतात. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईड कॅन्सरचा धोका जास्त असतो. आज आम्ही तुम्हाला थायरॉईड कॅन्सरच्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. 

लक्षणं

घश्यात सूज येणं

घश्याच्या खालच्या बाजूला वेदना होणं

घश्यात गाठ आल्याप्रमाणे आकार वाढणं

खाता- पिताना त्रास होणं

मासिक पाळीच्या वेळी नेहमीपेक्षा जास्त वेदना होणं

अशक्तपणा, सांधेदुखी

अचानक वजन वाढणं, वजन कमी होणं

साधारणपणे ३० वर्षापेक्षा जास्त वय असेल्या लोकांना ही समस्या जास्त उद्भवते.  रेडिएशन थेरेपीच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये थायरॉईड कॅन्सर वाढण्याचा धोका अधिक असतो.अल्ट्रासाउंड आणि  थायरॉइड स्कॅनमार्फत थायरॉईड कॅन्सरची चाचणी केली जाऊ शकते. या आजाराबद्दल माहिती मिळताच ऑपरेशन करून पूर्ण ग्रंथी काढून टाकली जाते. त्यानंतर जास्त वेळ न लावता रुग्णाची रेडीयोएक्टिव्ह आयोडीन थेरेपी केली जाते. थायरॉईड कॅन्सरमध्ये किमोथेरेपीआणि रेडीयोथेरेपीचा वापर काही प्रमाणात केला जातो.

उपाय

साखरेचं कमी प्रमाणात सेवन करा. शरीरात साखरेचं प्रमाण वाढवणार्‍या इतर पदार्थांचं प्रमाणही कमी करा. 

आहारात प्रोटिनचं प्रमाण वाढवा. शरीरात प्रोटिन्स थायरॉईड हार्मोन्सला टिश्यूजपर्यंत पोहचवतात. खाण्यात प्रोटिनचं प्रमाण वाढवल्यानं थायरॉईडची समस्या कमी होऊ शकते. 

अनेकदा या आजारात वजन वाढतं. तेव्हा महिला फॅटयुक्त आहार घेणं सोडून देतात. यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडलं जातं. अशा वेळी शरीराची गरज पूर्ण करणारे फॅट घेणे गरजेचे असते. हे फॅट हेल्दी असतील याची काळजी घ्या.

मादक पदार्थांचे सेवन करू नका. आर्यन असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.या आजारात महिलांमध्ये विशेषतः आयर्नची कमतरता भासते. अशा वेळी त्यांना आयर्नसोबतच इतर पोषक पदार्थही मोठ्या प्रमाणात घ्यायला हवेत. निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या

Web Title: Know the symptoms of thyroid cancer myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.