वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी आणि किती पाणी प्यावे? वाचाल तर होईल फायदा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 12:47 PM2024-04-06T12:47:46+5:302024-04-06T12:49:16+5:30
Drink Water To Lose Weight : वजन कमी करण्यासाठी किती आणि कधी पाणी प्यावं हाही महत्वाचा विषय आहे. ज्याबाबत अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही सांगणार आहोत.
Best Time To Drink Water To Lose Weight : वजन कमी करण्यासाठी पाणी पिणं किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळेच एक्सपर्टही दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण वजन कमी करण्यासाठी किती आणि कधी पाणी प्यावं हाही महत्वाचा विषय आहे. ज्याबाबत अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ काय असते?
एका रिपोर्ट्सनुसार, वजन कमी करण्यापर्यंत पाणी पिण्याची योग्य वेळ असते. पाणी अनेक प्रकारे आपली मदत करतं. ज्याप्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आजारात योग्य प्रमाणात पाणी आपली मदत करतं. जसं पचनात मदत करतं. पण हे सगळे फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही योग्य वेळेवर पाणी प्याल.
कधी प्यावं पाणी?
अनेक रिपोर्ट्स आणि डायटिशिअननुसार, सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणं फायदेशीर असतं. कारण जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा शरीर डिहायड्रेट होतं. अशात सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि सोबतच पचनातही मदत मिळते. त्यामुळे कोणतंही दुसरं ड्रिंक घेण्याआधी एक किंवा दोन ग्लास नॉर्मल पाणी प्या.
1) जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही पाणी प्यायला हवं. यावेळी पाणी प्यायल्याने तुम्ही चुकीचं काही खाणं टाळता. सोबतच कमी जेवण करता. डिहायड्रेशनमुळे नेहमीच तुम्हाला भूकेचे चुकीचे सिग्नल मिळू शकतात.
2) अनेक एक्सपर्ट जेवण करण्याआधीही थोडं पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण जेवणाआधी पाणी प्यायल्याने तुमचं पोट भरतं आणि यामुळे तुम्ही जास्त खाणार नाही. भूक लागली की, बरेचजण जास्त खातात आणि याने वजन वाढतं. रात्री जेवणाआधी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता.
3) एक्सरसाइजआधी आणि नंतर पाणी पिणं फार गरजेचं आहे. याने तुम्ही हाय्रेट रहाल. एक्सरसाइज दरम्यान आपलं शरीर पिलेल्या पाण्याला घामाच्या रूपाने रिलीज करतं. अशात वर्कआउटनंतर तुम्ही पाणी पिणं गरजेचं असतं.
वेगवेगळ्या कारणांनी पाणी पिण्याच्या खास वेळा असतात. पण याचा अर्थ असा नाही की, फक्त याच वेळेवर पाणी प्यावं. कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं. ती शरीराची गरज आहे. ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.