प्रोटीनच्या जास्त सेवनाने शरीराला होऊ लागतात या गंभीर समस्या, जाणून घ्या साइड इफेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:17 AM2024-01-17T10:17:19+5:302024-01-17T10:17:54+5:30
High Protein Side Effects: प्रोटीनचं जास्त सेवन केल्यानेही अनेक समस्या होऊ शकतात. चला जाणून घेऊ प्रोटीनच्या जास्त सेवनाचे साइड इफेक्ट...
High Protein Side Effects: प्रोटीन आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असतं. अनेक आजारांसोबत लढण्यासाठी शरीरात प्रोटीन असणं गरजेचं आहे. मात्र, प्रोटीनचं जास्त सेवन केल्यानेही अनेक समस्या होऊ शकतात. चला जाणून घेऊ प्रोटीनच्या जास्त सेवनाचे साइड इफेक्ट...
जर तुम्ही जास्त प्रोटीनचं सेवन केलं तर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या होते. याच्या जास्त सेवनाने लोकांना डायजेशनमध्ये समसम्या होते. तसेच पोटासंबंधी समस्याही वाढतात.
फार जास्त प्रोटीन खाल्ल्याने तुमचं वजनही वेगाने वाढू लागतं. लठ्ठपणा जास्त वाढतो. एक्स्ट्रा प्रोटीन फॅटच्या रूपात शरीरात दिसू लागतं.
प्रोटीनचं प्रमाण शरीरात जास्त असल्याने एनर्जीची लेव्हलही कमी होऊ लागते. शरीर कमजोर होऊ लागतं. तसेच तुम्हाला सतत थकवाही जाणवू लागतो.
प्रमाणापेक्षा जास्त प्रोटीनचं सेवन केल्याने डायरिया आणि पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. त्यामुळे प्रोटीनचं सेवन प्रमाणात किंवा कमी केलं पाहिजे.
प्रोटीनच्या जास्त सेवनाने शरीरातील हाडेही कमजोर होऊ लागतात. हाडांमध्ये वेदना होऊ लागतात.