हळदीच्या दुधाचे फायदे तर खूप माहीत असतील, आता शरीराला होणारे नुकसानही जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 05:06 PM2022-07-30T17:06:46+5:302022-07-30T17:07:21+5:30

Side Effects Of Turmeric Milk: जेव्हाही जखम होते, सूज येते तेव्हा हळदीचा वापर घरगुती उपाय म्हणून केला जातो. कारण या हीलिंग पॉवर जास्त असते. हळद आणि दूध एकत्र करून पिण्याचं चलन जास्त आहे.

Know the turmeric milk combination side effects for body | हळदीच्या दुधाचे फायदे तर खूप माहीत असतील, आता शरीराला होणारे नुकसानही जाणून घ्या!

हळदीच्या दुधाचे फायदे तर खूप माहीत असतील, आता शरीराला होणारे नुकसानही जाणून घ्या!

googlenewsNext

Side Effects Of Turmeric Milk: भारतात अनेक लोक हळदीचं दूध सेवन करतात. दूध हा परफेक्ट आहार मानला जातो कारण यात सर्व प्रकारचे न्यूट्रिएंट्स आढळतात. तेच हळदीचा वापर मसाला म्हणून जास्त होतो. पण जेव्हाही जखम होते, सूज येते तेव्हा हळदीचा वापर घरगुती उपाय म्हणून केला जातो. कारण या हीलिंग पॉवर जास्त असते. हळद आणि दूध एकत्र करून पिण्याचं चलन जास्त आहे. यात काहीच शंका नाही की, या पेयात औषधी गुण असतात, पण याने काही नुकसानही होतात.

प्रेग्नेन्सीमध्ये टाळावं

हळद उष्ण असते, त्यामुळे याच्या जास्त सेवनाने पोटात उष्णता निर्माण होते. गर्भवती महिलांनी हळदीचं दूध पिणं टाळलं पाहिजे. कारण याने गर्भपात होण्याची शक्यता असते. 

लिव्हरमध्ये कमजोरी

हळदीचं दूध प्यायल्याने लिव्हरचं खूप नुकसान होऊ शकतं. कारण उष्ण पदार्थ या महत्वाच्या अवयवासाठी चांगलं नसतं. लिव्हर कमजोर झाल्याने शरीरही अनेक प्रकारे लाचार होतं. शरीरात वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात.

पोटाची समस्या

जर तुम्ही एका दिवसात एक चमच्यापेक्षा जास्त हळदीचं सेवन कराल तर याने तुम्हाला पोटासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते. ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या असते त्यांनी हळदीचं दूध अजिबात पिऊ नये. या मसाल्यातील ऑक्सलेट कॅल्शिअमला नष्ट होऊ देत नाही. ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या होते. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात हळदीचं सेवन कमीत कमी करावं.

डायबिटीसमध्ये समस्या

डायबिटीसच्या रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्यावर खास लक्ष द्यावं लागतं. नाही तर ब्लड शुगर लेव्हल वाढते आणि वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. हळद डायबिटीसच्या रूग्णांसाठी नुकसानकारक मानली जाते. कारण या लोकांनी हळदीचं सेवन केलं तर नाकातून रक्त येण्याचा धोका वाढतो.

Web Title: Know the turmeric milk combination side effects for body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.