सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्रासले आहात? जाणून घ्या कारणं आणि उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 04:18 PM2018-08-28T16:18:38+5:302018-08-28T16:19:01+5:30

सध्या पावसाळा असल्याने अनेक आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. सर्दी, ताप, खोकल्यामुळे त्रस्त नागरिक अनेक ठिकाणी दिसतात.

know the tips for instant relief from cold and cough | सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्रासले आहात? जाणून घ्या कारणं आणि उपाय!

सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्रासले आहात? जाणून घ्या कारणं आणि उपाय!

googlenewsNext

>> डॉक्टर राहुल ठाकूर, (कान, नाक, घसा तज्ज्ञ)

सध्या पावसाळा असल्याने अनेक आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. सर्दी, ताप, खोकल्यामुळे त्रस्त नागरिक अनेक ठिकाणी दिसतात. त्यावर काही उपायांवर चर्चा करू. भरपूर पाणी प्यायले पाहिजे. अति तेलकट, तिखट व आंबट पदार्थ खाऊ नये. अंथरुण पांघरून कपडे नियमित धुवावेत. त्यातील धुलीकणांमुळेही खोकल्याचा संसर्ग वाढू शकतो. 

खोकल्यावर घरगुती उपचार :

- दिवसातून चार वेळा कोमट पाण्याच्या गुळण्या दररोज कराव्यात. त्यामुळे घशाची सूज व कफ कमी होते. गरम दूधात एक चमचा हदळ घालून प्यावी. आल्याचा चहा. तुळशीची पानं आणि आल्याचा काढा करून प्या.

- खोकल्याचे प्रमाण कमी असेल तर घरगुती उपाय करणे उपयोगाचे ठरते. मात्र खोकल्याबरोबरच घसा दुखत असेल. ताप आल्यासारखे वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे. कोरड्या खोकल्यासोबत दम लागला किंवा श्वास घेताना छातीतून सूसू आवाज येऊ लागल्यास तसेच झोपल्यावर जास्त खोकला येणे, आवाज बदलणे, खोकला सात दिवसांपेक्षा जास्त व खोकल्यामध्ये रक्त असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक राहिल.

- दैनंदिन जीवनात धुळीचे वाढते प्रमाण, हवामानातील बदल, अ‍ॅलर्जी यासारख्या गोष्टींमुळे खोकला येतो. मात्र खोकला हा रोग नसून, घसा व फुफ्फुसाची बिघडलेली स्थिती सांगणारे लक्षण आहे. 

खोकल्याची कारणे :

दूषित हवेचे श्वसन, धूम्रपान, दमा, ब्रॉँकायटीस, टीबी, फुफ्फुसातील कर्करोग अशी कारणे खोकल्यास कारणीभूत ठरतात.

खोकल्याचे प्रकार :

कोरडा खोकला, खोकताना कफ बाहेर येईल, असे वाटते पण तसे होत नाही. बेडका नसतो. घशात खवखव राहते. कोरडे थंड वारे, धूम्रपान यातील लक्षण वाढतात. गार वाऱ्याने खोकला बळावतो. श्वासोच्छ्श्वास अडथळा आल्याने झोपेतून जाग येते.

ओला खोकला - 

यामध्ये छातीत कफ भरून खोकताना बेडका पडतो.

खोकला टाळण्यासाठी - 

धूम्रपान ताबडतोब बंद करणे. तसेच सिगारेट ओढणाºया व्यक्ती जवळही पेशंटने थांबू नये. प्रदूषणापासून जेवढे जमेल तेवढे लांब रहावे. दररोज प्राणायाम करावा.

Web Title: know the tips for instant relief from cold and cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.