तुमच्या शरीराबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितही नसतील, 'हे' सिक्रेट्स तुम्हाला अकाली मृत्यूपासून दूर ठेवतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 01:32 PM2021-09-15T13:32:39+5:302021-09-15T13:39:31+5:30

शरीरात अशी शेकडो तथ्यं आहेत, ज्याबद्दल फक्त वैद्यकीय विद्यार्थ्यांनाच माहिती आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला शरीराच्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला यासंबंधित काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत.

know the truths about your body understand the secrets of human body | तुमच्या शरीराबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितही नसतील, 'हे' सिक्रेट्स तुम्हाला अकाली मृत्यूपासून दूर ठेवतील

तुमच्या शरीराबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितही नसतील, 'हे' सिक्रेट्स तुम्हाला अकाली मृत्यूपासून दूर ठेवतील

googlenewsNext

मानवी शरीर हे जगातील सर्वात मोठे रहस्य आहे. मेंदूपासून शरीराच्या प्रत्येक भागाची महत्वाची भूमिका असते. आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शास्त्रज्ञांनी खूप काम केलं आहे. असं असूनही, मोठे वैद्यकीय विज्ञान तज्ज्ञही शरीराला पूर्णपणे समजू शकलेले नाहीत.

शरीरात अजूनही बरेच काही आहे जे अद्याप जाणून घेणं बाकी आहे. म्हणजेच शरीरात अशी शेकडो तथ्यं आहेत, ज्याबद्दल फक्त वैद्यकीय विद्यार्थ्यांनाच माहिती आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला शरीराच्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला यासंबंधित काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत.

हृदयाशी संबंधित महत्त्वाची माहिती
तुमच्या हृदयावर इतका दबाव आहे की ते ३० फूट दूरपर्यंत रक्त फेकू शकतं. त्यामुळे जेव्हा मानेवर वार होतो त्यावेळी रक्त दूरवर फेकलं जातं. तुम्ही तुमच्या हृदयाचे ठोके लक्ष देत नाही, पण तुमचं हृदय एका दिवसात सुमारे १ लाख वेळा धडकतं.

लाखो रक्तपेशी
आपल्या शरीरात एकूण ६ लिटर म्हणजेच १.६ गॅलन रक्त आहे. हे रक्त शरीरात उपस्थित असलेल्या करोडो रक्तपेशींमध्ये वाहतं. आपल्या शरीरात ३० लाख कोटी लाल पेशी रक्त पेशी आहेत.

डोळ्यांची माहिती
मानवी डोळ्यात एकूण १२७ दशलक्ष रेटिना पेशी आहेत. त्यांच्या मदतीने आम्ही १ कोटी विविध रंग ओळखण्यास सक्षम आहोत.

स्पर्म
पुरुषांमध्ये दररोज सुमारे १० कोटी स्‍पर्म प्रोड्यूस होतात. हायटेक वैद्यकीय उपकरणांशिवाय त्यांना पाहणं आणि मोजणं अशक्य आहे.

त्वचेच्या पेशी
मानवी शरीरात लाखो पेशी असतात. प्रत्येक मनुष्यामध्ये सुमारे २०० वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. या संदर्भात, जर आपण त्वचेच्या पेशींविषयी बोलायचं म्हटलं, तर एका संशोधनात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार त्यांची संख्या सुमारे १०० अब्ज आहे.

Web Title: know the truths about your body understand the secrets of human body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.