निरोगी राहण्यासाठी रोज किती चालायला हवं? जाणून घ्या ५ ते ६० वर्ष वयोगटाचा प्रभावी 'वॉक प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 07:14 PM2020-08-19T19:14:52+5:302020-08-19T19:17:32+5:30

अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा.

Know the walk plan of people in the age group of 5-60 years | निरोगी राहण्यासाठी रोज किती चालायला हवं? जाणून घ्या ५ ते ६० वर्ष वयोगटाचा प्रभावी 'वॉक प्लॅन'

निरोगी राहण्यासाठी रोज किती चालायला हवं? जाणून घ्या ५ ते ६० वर्ष वयोगटाचा प्रभावी 'वॉक प्लॅन'

googlenewsNext

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी नेहमी व्यायाम करणं किंवा चालणं महत्वाचं असतं. सतत आजारी पडायचं नसेल तर तुम्ही रोज चालून आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकता. पण त्यासाठी किती चालायला  किंवा चालण्यची योग्य पद्धत माहीत असणंही तितकंच महत्वाचं आहे.  अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही ३० मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. चला तर मग जाणून घेऊया चालण्याचे फायदे काय काय  आहेत. 

दररोज चालल्यानं  हृद्यासंबंधी आजारांचा धोका टळतो. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
रोज चालायची सवय असेल तर मेंदूसाठी फायदेशीर ठरतं. चालण्यामुळे  ताणतणाव कमी होतो. मुडही फ्रेश राहतो. डिमेंशिया आणि अल्झायमर असे आजार चालण्यामुळे उद्भवत नाहीत. 

चालण्यामुळे फुफ्फुसांपर्यंत मोकळी हवा पोहोचते. परिमाणी ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो. फुफ्फुसांच्या आजारांपासून लांब राहता येतं. नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. याशिवाय चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच, तुमच्या सृजनशीलतेला चालना मिळते. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. पचनक्रिया चांगली राहते.

दररोज किती चालायला हवं?

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दररोज कमीतकमी अर्धा तास चालायला हवं. १०००० पावलं म्हणजेच ६ ते ७ किलोमीटर चालणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. चालण्यामुळे शरीराला उर्जा प्राप्त होते. प्रमाणापेक्षा जास्त चालण्याची आवश्यकता नाही. कारण गरजेपेक्षा जास्त चालल्यानं थकवा जाणवू शकतो. 

कोणत्या वयोगटातील व्यक्तीनं किती चालायला हवं

६ ते १७ वर्ष वयोगटातील लोकांनी १५००० पावलं चालायला हवं. १२०० पावलंही चालू शकता. १८ ते ४० वर्ष वयोगटातील लोकांनी  १२००० पावलं चालणं उत्तम ठरेल. ५० वर्ष वय असलेल्या लोकांनी १०००० पावलं चालायला हवं. ६० वर्ष वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्यांनी ८००० पावलं चालायला हवं. 

हे पण वाचा-

खुशखबर! भारतात सर्वाधिक लोकांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी एंटीबॉडी तयार

कोरोनाचं ३ तिसरं लक्षणं आहे अंगदुखी आणि मासपेशींतील वेदना; 'या' उपायांनी मिळवा आराम

Web Title: Know the walk plan of people in the age group of 5-60 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.