'या' जपानी कंडोमची सगळीकडे होतेय चर्चा, जाणून घ्या काय आहेत फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 11:53 AM2019-12-23T11:53:45+5:302019-12-23T14:04:48+5:30

सर्वसाधारणपणे शरीरसंबंध ठेवत असताना गर्भधारणा टाळण्यासाठी सगळ्यात सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणून कंडोम वापरले जाते.

know what are the benefits Japanese condom | 'या' जपानी कंडोमची सगळीकडे होतेय चर्चा, जाणून घ्या काय आहेत फायदे

'या' जपानी कंडोमची सगळीकडे होतेय चर्चा, जाणून घ्या काय आहेत फायदे

googlenewsNext

सर्वसाधारणपणे शरीरसंबंध ठेवत असताना गर्भधारणा टाळण्यासाठी सगळ्यात सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणून कंडोम वापरले जाते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे तसंच वेगवेगळ्या ब्रँण्डचे कंडोम उपलब्ध आहेत. पण सध्याच्या काळात बाजारात एका नविन कंडोम प्रचलित आहे. त्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? या कंडोमला जगातलं सगळ्यात बारिक असलेलं कंडोम म्हणून ओळखलं जातं. तसंच  सगळ्यात सुरक्षित म्हणून सुद्दा ह्या कंडोमचा वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊया या खास बनाटीच्या जपानी कंडोम बद्दल. 

(image credit- abs-cbn news)

जपानी कंडोम हे जपानच्या काही संशोधकांनी काही वर्षीपूर्वी तयार केले होते.  हे कंडोम तयार केल्यानंतर त्यांनी हे कंडोम जगातील सगळ्यात पातळ कंडोम असल्याचा दावा केला आहे. सध्याच्या काळात जे कंडोम बाजारात मिळतात त्यांची जाडी ०.०६mm इतकी आोह तर जपानी कंडोमची जाडी ०.०३८mm आहे. म्हणून या कंडोमला ००३ कंडोम असं सुद्धा म्हटलं जातं.


 (image ceedit-customcondomsfactory.com)

सुरक्षिततेच्या दृष्टीने हे जपानी कंडोम खूप चांगलं समजल जातं. तज्ञांच्या म्हणण्यानुसार शरीर संबंधाच्या दरम्यान याचा वापर केल्यास कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवण्याचा धोका नसतो. तसंच गर्भधारणासुद्धा  होण्याची शक्यता नसते. या कंडोमची खासियत अशी आहे कि, हे कंडोम खूप पातळ असल्यामुळे तुम्ही शरीरसंबंधादरम्यान अधिक चांगल्याप्रकारे याचा वापर करू शकता. 

(image credit- Rappelar)

पातळ कंडोम खरेदी करत असताना काही गोष्टींचा काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी हे कंडोम कोणत्या मटेरिअल पासून तयार केलेले आहे हे बघा. काही कंडोम हे लॅटेक्स तर काही नॉन लॅटेक्सपासून तयार झालेले असतात. पॉलीयूरिथेन आणि पॉलीआइसोप्रीन असे असतात. जर तुम्हाला लॅटेक्सची एलर्जी असेल तर  कितीही पातळ असेल तरी त्यांचा वापर करू नका. 

अनेक प्रकारचे पातळ कंडोम हे बेस्ट लुब्रिकेंट्स  सह येतात. अशा कंडोमचा वापर करण्यापेक्षा सिलिकॉन बेसड् कंडोमचा वापर करा.  मोठ्या प्रमाणावर लोकांनी असं वाटतं की कंडोम जितकं पातळ असेल तितकंच जास्त जोखमिचं ठरू शकतं. कारण ते फाटण्याची शक्यता असते. पण जपानी कंडोम अनेकदा चाचणी करुन तयार केलं जातं. त्यामुळे  त्याचा वापर करणं सुरक्षित ठरतं. 

Web Title: know what are the benefits Japanese condom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.