दिवसेंदिवस कंबरदुखी वाढतीये? या टिप्सने दूर करा समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 10:37 AM2019-03-27T10:37:09+5:302019-03-27T10:40:15+5:30
आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे जास्तीत जास्त लोकांना कंबरदुखीची समस्या भेडसावत असते. खासकरून लहान मुलं आणि तरूणांमध्ये.
(Image Credit : SpineUniverse)
आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे जास्तीत जास्त लोकांना कंबरदुखीची समस्या भेडसावत असते. खासकरून लहान मुलं आणि तरूणांमध्ये. खेळताना जखम होणे, जॉइंट्सवर सतत प्रेशर पडणे किंवा फार जास्तवेळ एकाच पद्धतीने बसणे यामुळे हे होतं. काही बाबतील पाठिच्या मणक्यासंबंधित समस्याही निर्माण होऊ शकते.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये अभ्यासकांनी कंबरदुखी, धुम्रपान आणि अल्कोहोल यांच्यातील कनेक्शन जाणून घेतलं. जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, अभ्यासकांना आढळलं की, कंबरदुखीने ग्रस्त असलेले तरूण धुम्रपान आणि मद्यसेवनाचे शिकार होतात. त्यामुळे ते टेन्शन, स्ट्रेस आणि डिप्रेशनसारख्या समस्यांचा सामना करतात. अशात लहान मुलांमधील किंवा तरूणांमधील ही कंबरदुखी दूर कशी करावी याच्या काही टिप्स खालीलप्रमाणे सांगता येतील. QI Spine Clinic काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यांच्या माध्यमातून मुला-मुलींना होणाऱ्या समस्यांपासून बचाव करता येईल.
१) लहान मुलांना सतत बसून राहण्यासाठी फोर्स करू नका. सतत बसून राहणे चांगली सवय नाही. जितकं शक्य आहे तितकी त्यांना चालण्या-फिरण्याची सवय लावा.
२) तुम्ही तुमच्या मुला-मुलींसाठी सर्वात मोठे आदर्श आहात. त्यामुळे अशी लाइफस्टाइल अजिबात अवलंबू नका ज्याचा तुमच्या मुला-मुलींवर वाईट प्रभाव पडेल.
३) मुलांना नेहमी सरळ बसण्याचा सल्ला द्या. याचीही काळजी घ्या की, तुमच्या मुला-मुलींची बॅगही जास्त जड असू नये.
४) जर कंबरदुखीमुळे तुमची मुलं-मुली झोपू शकत नसतील किंवा त्यांच्या रोजच्या गोष्टींवर याचा नकारात्मक प्रभाव पडत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.
५) खेळताना, सायकल चालवताना होणाऱ्या जखमांची माहिती घेत रहा. जेणेकरून अशा स्थितीमध्ये तुम्ही वेळेवर उपाय करू शकाल.
६) जेव्हा तुमची मुलं एखाद्या खेळण्याच्या स्पर्धेत भाग घेत असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घ्या. समजा तुमच्या मुलांनी स्कीइंग, स्केटिंग किंवा स्नोबर्डिंग शिकणे सुरू केले असेल तर आधी या खेळांचं टेक्निक, स्टाइल आणि इतरही काही गोष्टी जाणून घ्या.
७) सायकल किंवा बाईक चालवताना मुलांना हेल्मेट, माऊथ गार्ड, रिस्ट गार्ड आणि नी गार्ड वापरावं. याने जखम होण्याचा धोका टाळता येऊ शकतो.
८) मुलं-मुली तरूण होत असताना त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करा. आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठी त्यांना प्रोत्साहित करा.