बापरे! चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय थॅलेसीमिया आजार; 70% बाधित मुलांना नाही मिळत डोनर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 07:24 PM2022-03-15T19:24:38+5:302022-03-15T19:26:21+5:30

Thalassemia : शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे हा आजार अनेक मुलांना जडतो तसेच वेळेवर रक्त मिळाले नाही तर अनेकांचा मृत्यू देखील या आजारामुळे होतो.

know what is thalassemia 70 percent of children suffering from it do not get the honor | बापरे! चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय थॅलेसीमिया आजार; 70% बाधित मुलांना नाही मिळत डोनर

बापरे! चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय थॅलेसीमिया आजार; 70% बाधित मुलांना नाही मिळत डोनर

Next

नवी दिल्ली - देशभरात प्रत्येक वर्षी हजारो मुलांना थॅलेसीमिया (Thalassemia) हा आजार होतो. शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे हा आजार अनेक मुलांना जडतो तसेच वेळेवर रक्त मिळाले नाही तर अनेकांचा मृत्यू देखील या आजारामुळे होतो. जी मुलं या आजाराचा सामना करतात. त्यांचे जीवन सोपे नसते. त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. डॉक्टरांच्या मते, हा एक जेनेटिक आजार (Genetic Disease) आहे. याचा अर्थ आई वडिलांकडून हा आजार मुलांमध्ये पसरतो. बाळ जन्मल्यानंतर सहा ते आठ महिन्यांमध्ये या आजाराचे लक्षणे दिसून येतात थॅलेसिमिया बाधित असणाऱ्या मुलाच्या शरीरामध्ये लाल रक्त पेशी वेगाने कमी होत जातात आणि नवीन पेशींची निर्मिती देखील होत नाही. या कारणांमुळे या मुलांच्या शरीरात नेहमी रक्ताची कमतरता निर्माण होत असते. 

आजारपणात आरबीसी (RBC) फक्त 10 ते 25 दिवसापर्यंत शरीरामध्ये टिकतात. सर्वसामान्य शरीरामध्ये 125 दिवसापर्यंत आरबीसी जिवंत राहतात म्हणूनच या आजाराने त्रस्त असणाऱ्या मुलांना 20 ते 25 दिवसानंतर रक्त चढवावे लागते. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल येथील पीडियाट्रिक हिमटोलॉजी विभागाचे डॉ. गौरव खारया यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात प्रत्येक वर्षी असे 10 हजार नवीन घटना समोर येतात. यापेक्षा 3 पटीने जास्त रुग्ण सिकल सेलचे दिसून येतात. या रुग्णांना आयुष्यभर ब्लड ट्रान्सफ्यूजन आणि आयरन चिलेशनची आवश्यकता लागते. या दोन्ही रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे एक मात्र उपचार आहे परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी की, फक्त 20 ते 25 टक्के रुग्णांना त्यांच्या परिवाराकडून एचएलए आयडेंकिल डोनर सहज उपलब्ध होतात यामुळे रुग्णांचे ट्रान्सप्लांट होत नाही. ट्रान्सप्लांट न झाल्यामुळे रुग्णाला नियमित रक्ताची गरज भासते व रुग्णाला नेहमी शरीरात रक्त चढवावे लागते. 

वारंवार शरीरामध्ये रक्त चढवल्यास रुग्णाच्या शरीरावर विपरीत परिणाम देखील दिसून येतात. बाल रोग विशेषज्ञ डॉ. प्रदीप कुमार यांच्या मते, थॅलेसीमिया असे दोन प्रकार असतात.एक सौम्य असतो आणि एक भयंकर तीव्र प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. सौम्य थॅलेसीमियाच्या प्रकारांमध्ये लहान मुलांना जास्त त्रास सहन करावा लागत नाही परंतु तीव्र थॅलेसीमिया मध्ये मुलाला प्रत्येक 20 ते 25 दिवसांनंतर एक युनिट रक्त चढवावे लागते. वारंवार रक्त चढवल्याने अनेकदा शरीरामध्ये आयरन सुद्धा वाढून जाते त्यामुळे अन्य आजार होण्याची शक्यता असते. तीव्र थॅलेसेमीया बाधित असणाऱ्या मुलाला बोन मॅरो ट्रान्सप्लांट साठी डोनर सहज उपलब्ध होत नाही. या कारणामुळे अनेक मुलं आयुष्यभर या आजाराला सामोरे जात असतात. डॉ. प्रदीप यांच्या मते, जर तुम्ही बाळाचा विचार करत असाल तर अशा वेळी संपूर्ण चाचणी करायला पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला कळून येईल की, आपल्याला कोण कोणते आजार आहेत किंवा नाही. 

थॅलेसीमियाची लहान मुलांमध्ये आढळणारी लक्षणे

नेहमी अशक्तपणा जाणवतो.
नखं, डोळे आणि जिभेवर पिवळा थर जमा होणे. 
मुलांची वाढ न होणे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: know what is thalassemia 70 percent of children suffering from it do not get the honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.