Water weight: अचानक वजन कमी झाल्यावर डॉक्टर म्हणतात वॉटर लॉस झाला! पण हे वॉटर वेट म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 05:20 PM2022-02-17T17:20:57+5:302022-02-17T17:21:05+5:30

तुम्हाला माहितीये का जास्त प्रमाणात पाणी पिणंही तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. यातील एक समस्या म्हणजे वॉटर वेट.

know what is water weight understand the meaning of water loss | Water weight: अचानक वजन कमी झाल्यावर डॉक्टर म्हणतात वॉटर लॉस झाला! पण हे वॉटर वेट म्हणजे काय?

Water weight: अचानक वजन कमी झाल्यावर डॉक्टर म्हणतात वॉटर लॉस झाला! पण हे वॉटर वेट म्हणजे काय?

googlenewsNext

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं फार गरजेचं असतं. डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नेहमी हायड्रेट राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुम्हाला माहितीये का जास्त प्रमाणात पाणी पिणंही तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. यातील एक समस्या म्हणजे वॉटर वेट (Water Weight).

वॉटर वेट म्हणजे काय?
तुमच्या शरीरात जेव्हा पाण्याचं प्रमाण वाढतं त्यावेळी तुमच्या वजनामध्ये वाढ होते. याला वॉटर वेट असं म्हटलं जातं. ही समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसं की, शारीरिक हालचाल कमी होणं, जंक फूडचे सेवन इत्यादी.

तुमच्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पोट दुखी, शरीराला सूज येणं तसंच बेली फॅट वाढणं या तक्रारींचा सामना करावा लागतो. एका संशोधनातून असं समोर आलं आहे की, शरीरात पाण्याची पातळी वाढली की सोडियमची मात्र कमी होऊ लागते. सोडियमची मात्र कमी झाल्यानंतर मेंदूला सूज येऊ शकते. 

शरीरात पाण्याची पातळी वाढू नये म्हणून डिहाड्रेशन होणार नाही याची काळजी घ्यावी. शरीरात पाणी कमी झालं की शरीरात ही लक्षणं दिसू लागतात.

त्वचा कोरडी होणं
शरीरात पाणी कमी झालं की त्वचा कोरडी पडते. यावेळी ओठंही सुकू लागतात.

छातीत जळजळ होणं
शरीरात पाण्याची कमतरता झाली की पोटात काही प्रमाणात जळजळ होऊ लागते. शिवाय यामुळे एसिडिटी होण्याचाही धोका असतो.

तोंडाला दुर्गंध येणं
शरीरात पाणी कमी झालं ती तोंडात लाळ पुरेश्या प्रमाणात बनत नाही. लाळ ही तोंडातूल बॅक्टेरिया आणि दुर्गंधीला रोखण्यास मदत करतात. पाण्याच्या कमतरतेने लाळ तयार झाली नाही की, तोंडातून दुर्गंधी येते.

लघवी संदर्भात समस्या
जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा दिसत असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. त्याचप्रमाणे डिहायड्रेशनमध्ये लघवीची मात्र कमी होऊन जळजळ होऊ शकते. 

Web Title: know what is water weight understand the meaning of water loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.