सेरोलॉजिकल टेस्ट म्हणजे काय? माहीत करून घ्या कोरोना विषाणूंच्या तपासणीची ही पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 05:31 PM2020-05-21T17:31:01+5:302020-05-21T17:37:50+5:30
कोरोना व्हायरसच्या टेस्टिंसाठी शास्त्रज्ञांना लोकांच्या रक्ताची सुद्धा तपासणी करावी लागते.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात ५० लाखांपेक्षा जास्त लोकांना संसर्गचा झाला आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन आजाराची चाचणी करण्यासाठी नाक आणि घश्यातील स्वॅब तपासले जातात. कोरोना व्हायरसच्या टेस्टिंसाठी शास्त्रज्ञांना लोकांच्या रक्ताची सुद्धा तपासणी करावी लागते. कारण लोकांमध्ये रक्ताची तपासणी केल्यानंतर सार्स-सीओवी-2 या आजाराचं संक्रमण झालं आहे की नाही हे पाहिलं जातं. या टेक्निकला सेरोलॉजिकल टेस्टिंग असं म्हणतात.
सेरोलॉजिरल टेस्टिंग अशी तपासणी या ज्याद्वारे रक्तातील एंटीबॉडीजची तपासणी केली जाते. वेगवेगळ्या आजारांच्या तपासणीसाठी वेगवेगळ्या सेरोलॉजिक टेस्ट केल्या जातात. तरी सुद्धा यामध्ये एक सारखेपण असतं ते म्हणजे इम्यून सिस्टीमकडून तयार करण्यात आलेल्या प्रोटीन्सवर फोकस असतो. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवून शरीरावर होणारं संक्रमण रोखता येऊ शकतं. या ब्लड टेस्टमध्ये रक्तात असलेल्या प्लाज्मा आणि सिरमची तपासणी केली जाते.
शरीरात प्रवेश करणारे विषाणू एंटीजन्स विरुद्ध शरीरातील इम्यून सिस्टीम एंटीबॉडीज तयार करतात. एंटीबॉडी एंटीजन्सचा स्वतःशी अटॅक करून त्यांना निष्क्रिय करतात. जेव्हा डॉक्टर रक्तातील नमुन्यांमध्ये असलेले एंटीबॉडी तपासून तुम्हाला कोणत्या प्रकारंच इन्फेक्शन झालं आहे, याबाबत सांगितलं जातं. या आजाराला ऑटोइम्यून आजार म्हणतात. सेरोलॉजिक टेस्टने या एंटीबॉडीची तपासणी करता येऊ शकते. टेस्टिंग करताना एंटीबॉडीज दिसून आले नाही तर व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं नाही, ज्या टेस्टमध्ये एंटीबॉडी नसतील अशी टेस्ट नॉर्मल मानली जाते.
धोका वाढला! हवेतूनही १८ फुटांपर्यंत होऊ शकतो कोरोनाचा प्रसार,'या' लोकांना बसेल जास्त फटका...
घाबरू नका! पुन्हा पॉझिटिव्ह येणाऱ्या कोरोना रुग्णांचं आता नो टेन्शन, अभ्यासात नवा खुलासा