घाम आणि खाजेमुळे तुम्हीसुद्धा व्हाल STD चे शिकार, जाणून घ्या ट्रायक्रेमोनिएसिसची गंभीर लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 10:06 AM2020-04-10T10:06:39+5:302020-04-10T10:06:59+5:30
गरमीचं वातावरण सुरू झाल्यामुळे शरीरातील घाम आणि उष्णतेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे त्वचेचे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.
जीवनशैलीत झालेला बदल, वातावरणातील बदल यांमुळे पुरूषांना तसंच महिलांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. सध्या गरमीचं वातावरण सुरू झाल्यामुळे शरीरातील घाम आणि उष्णतेचं प्रमाण वाढतं. परिणामी त्वचेचे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. क्लॅमाइडिया, गोनोरिया, ट्राइकोमोनिएसिस या आजारांबद्दल तुम्हाला माहित आहे का ? हे आजार सेक्शुअली ट्रांसमिडेट डिजीजमध्ये येतात.
काहीवेळा अशा आजारांवर दुर्लक्ष केल्यामुळे कित्येक महिने याचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला ट्राइकोमोनिएसिस नक्की काय आहे. याबाबत सांगणार आहोत. ट्राइकोमोनिएसिसला ट्रिक असं सुद्धा म्हटलं जातं. महिला आणि पुरुषांना आजार होऊ शकतो. पण पुरूषांच्या तुलनेत महिलांना सगळ्यात जास्त या आजाराचा सामना करावा लागतो.
हा आजार सिंगल सेल प्रोटोजोआच्या संक्रमणामुळे पसरत जातो. हे संक्रमण शारीरीक संबंधादरम्यान होऊ शकतं. महिलांच्या प्रायव्हेट पार्टसच्यावर म्हणजेच वजायना, गर्भाशयाचा भाग, मुत्राशय, या भागात या आजाराचं संक्रमण होतं. तर पुरूषांमध्ये आतल्या भागात संक्रमण होतं. पण प्रायव्हेट पार्टसच्या व्यतिरिक्त शरीराच्या इतर भागात हे संक्रमण पोहोचत नाही. ( हे पण वाचा-CoronaVirus: एसीमुळे वाढतो कोरोनाचा धोका?; जाणून घ्या)
पुरुषांमध्ये ट्राइकोमोनिएसिसची लक्षणं
खाज येणे, जळजळ होणे.
लघवी करताना जळजळ होणे.
महिलांमध्ये असणारी लक्षणं
योनीमार्गात खाज येणे, जळजळ होणे.
त्वचा लाल होणे, कोरडी पडणे.
पांढरा स्त्राव होणे.
लघवी करण्यासाठी त्रास होणे.
यापैकी कोणतीही लक्षणं दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला ट्राइकोमोनिएसिसचा आजार असू शकतो. दुर्लक्ष केल्यास संक्रमण वाढण्याची शक्यता असते, या आजारापासून बचावाचे उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी एकापेक्षा जास्त शरीरसंबंध ठेवू नका. लेटेक्स कंडोमचा वापर करा. तुम्हाला या आजाराची लक्षण दिसत असतील डॉक्टरांशी बोलून तपासणी करून गोळ्यांचा कोर्स पूर्ण करा. जेणेकरून तुम्हाला सेक्शुअली ट्रांसमिटेड आजारांपासून लांब राहता येईल.
( हे पण वाचा- तासंतास टीव्ही, लॅपटॉपसमोर बसत असाल तर 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी, नाही तर टीव्ही बघणं पडेल महागात....)