काय आहे यल्लो फिवर?; जाणून घ्या काय आहेत लक्षणं...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 12:07 PM2019-08-15T12:07:18+5:302019-08-15T12:13:56+5:30
यल्लो फिवर डासांच्या एका विशेष प्रजातीमुळे होतो. खासकरून जगभरातील अनेक देशांमध्ये हे इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे. जर तुम्ही भारतातून विदेशात जात असाल तर काही देशांमध्ये जसं की, आफ्रिका आणि साउथ अमेरिकेत जाण्याआधी तुम्हाला याचं लसीकरणं करून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
यल्लो फिवर डासांच्या एका विशेष प्रजातीमुळे होतो. खासकरून जगभरातील अनेक देशांमध्ये हे इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे. जर तुम्ही भारतातून विदेशात जात असाल तर काही देशांमध्ये जसं की, आफ्रिका आणि साउथ अमेरिकेत जाण्याआधी तुम्हाला याचं लसीकरणं करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अशा देशांमध्ये यल्लो फिवर मोठ्या प्रमाणात थैमान घालत आहे. या देशांमध्ये फिरण्यासाठी किंवा कामासाठी गेल्यानंतर तेथील डासांमुळे तुम्हालाही संक्रमण होऊ शकतं. त्यामुळे आधीच लसीकरण करून हा धोका कमी केला जाऊ शकतो.
काय आहे यल्लो फिवर?
यल्लो फिवर विषाणूंद्वारे उत्पन्न होणारा हॅमोरेजिक रोग आहे. जो माणसांमध्ये संसर्ग झालेले डास चावल्यामुळे होतो. या आजारातील यल्लो हा शब्द कावीळ संदर्भात वापरण्यात येतो. हा रोग संपूर्ण शरीराला प्रभावित करतो.
(Image Credit : https://www.khaskhabar.com)
यल्लो फिवरवर उपचार...
द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, यल्लो फिवरची लागण जाल्यानंतर जवळपास 50 टक्के लोकांना आपला जीव गमवावा लागतो. परंतु, वेळवर लसीकरण केल्यामुळे यापासून बचाव करणं शक्य होतं. यल्लो फिवरच्या संक्रमणामुळे ताप, डोकेदुखी आणि उलटी यांसारख्या लक्षणांचा सामना करावा लागू शकतो. गंभीर परिस्थितींमध्ये हृदय, लिव्हर आणि किडनी संबंधित जीवघेण्या लक्षणांचाही सामना करावा लागतो.
यल्लो फिवरची लक्षणं :
- ताप
- डोकेदुखी
- तोंड, नाक, कान आणि पोटामध्ये रक्तस्त्राव होणं
- उलट्या आणि अस्वस्थ वाटणं
- लिव्हर आणि किडनी संबंधित आजा होणं
- पोट दुखणं
- काविळ
यल्लो फिवरचं वॅक्सिनेशन
त्वचेच्या आतमध्ये जाणारं 0.5 मिलीच्या फक्त एका इन्जेक्शनमुळे 10 दिवसांमध्ये रोगप्रतिरोधक शक्ती विकसित होते आणि पुढिल 10 दिवसांपर्यंत शरीराचं रक्षण करते. प्रत्येक देशामध्ये टिकाकरण कार्ड अजिबात आवश्यक नसतं. हे यल्लो फिवरचा संसर्ग जास्त असणाऱ्या देशांमध्ये आवश्यक असतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआदी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.