जिभेच्या रंगावरून ओळखा तुम्हाला कोणता आजार झालाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 12:24 PM2018-08-21T12:24:41+5:302018-08-21T12:40:31+5:30

जिभेच्या रंगावरुन आरोग्याची स्थिती आणि गंभीर आजारांची माहिती मिळण्यास मदत होते.

Know What your tongue says about your health | जिभेच्या रंगावरून ओळखा तुम्हाला कोणता आजार झालाय

जिभेच्या रंगावरून ओळखा तुम्हाला कोणता आजार झालाय

googlenewsNext

सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण आरशामध्ये स्वतःचा चेहरा न्याहाळतो. ही सवय शक्यतो सर्वांनाच असते. मात्र तुम्ही कधी स्वतःची जीभ पाहिली आहे का?, उत्तर 'नाही' असंच असणार. पण वेळीच जीभ पाहण्याचीही सवय लावून घेतली, तर आरोग्याच्या दृष्टीनं आपल्याला चांगला फायदा होईल, हे नक्की. आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टर सर्वप्रथम जीभेची तपासणी का करतात?. कारण जिभेवरच आपल्या संपूर्ण शरीराचं आरोग्य अवलंबून असते. जिभेमुळेच आपल्या शरीरावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. जिभेचा रंग आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी, औषधं आणि पेयांनुसार बदलतो. धूम्रपान-मद्यपान करण्याच्या सवयीमुळेही जिभेचा रंग बदलतो. याव्यतिरिक्त आपला आहार, अपूर्ण झोप, आजार आणि अन्य कारणांमुळेही जिभेचा रंग बदलतो. जिभेच्या बदलत्या रंगामुळे आपल्याला कोणता आजार झाला आहे, हे समजण्यास मदत होते. संपूर्णतः नाही पण आजाराचा प्राथमिक अंदाज लावला जाऊ  शकतो.  

1. जिभेवर पिवळ्या रंगाचा थर तयार होणे
जिभेवर जर पिवळ्या रंगाचा दाट थर जमा झाला असेल तर याचा अर्थ तोंडाची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नियमित जीभ योग्य प्रकारे स्वच्छ करण्याची सवय करुन घ्यावी. गरजेहून अधिक गरम पदार्थांचं सेवन करणं किंवा जिवाणूंमुळे जिभेवर दाट पिवळ्या रंगाचा थर साचण्यास सुरुवात होते. यावरुन तोंडात जिवाणूंचं संक्रमण जास्त होत असल्याचं समजते. जिवाणूंमुळे ताप-सर्दी-खोकला, श्वसनाचे आजार होतात. 

2. जीभ लाल होणे
जिभेवरील लाल रंगांचे डाग हळू-हूळ पूर्ण जीभच लाल करतात. जिभेचं लाल होणं हे अॅनिमिया आजाराचं प्राथमिक लक्षण मानले जाते. शरीरात व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळेही जीभ लाल होण्याची शक्यता असते.   

3. जीभ अधिक चिकट होणे
जीभ हा आपल्या शरीराचा एक छोटासा मात्र महत्त्वपूर्ण असा भाग आहे. त्यामुळे जिभेचं आरोग्य चांगले असणं अधिक महत्त्वाचे असते. काही जणांची जीभ पूर्णतः चिकट-गुळगुळीत असते. शरीरात पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे जीभ चिकट-गुळगुळीत होण्याची समस्या उद्भवते. ज्यांना धुम्रपानाची सवय असते, अशा लोकांमध्ये जीभ चिकट व गुळगुळीत होण्याची समस्या असते. धुम्रपानाची सवय बंद करुन या व्यक्तींनी आपल्या जिभेच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचे आहे. 

4. तोंड येण्याची समस्या
जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्यानं तोंड येण्याची समस्या निर्माण होते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अल्सरची समस्या उद्भवते.

5. पांढऱ्या रंगाचे चकत्या तयार होणे
चीजप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या जिभेवर चकत्या तयार होणं हे लक्षणं आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक असते. कमकुवत रोगप्रतिकार क्षमता, औषधं यामुळे जिभेवर पांढऱ्या रंगाच्या चकत्या तयार होतात. पण हे लक्षण म्हणजे गंभीर आजार उद्भवण्याचा एक इशारा आहे. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. 


 

Web Title: Know What your tongue says about your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.