'हे' आहे दुपारच्या जेवणानंतर झोप येण्याचं कारण, तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 10:52 AM2019-06-04T10:52:18+5:302019-06-04T10:59:02+5:30
तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल की, दुपारचं जेवण केल्यावर झोप येऊ लागते आणि सोबतच आळसही येतो.
(Image Credit : Medical News Today)
दुपारचं जेवण केल्यावर काही लोकांना मस्त झोप काढण्याची सवय असते. पण ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे शक्य नसतं. तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल की, दुपारचं जेवण केल्यावर झोप येऊ लागते आणि सोबतच आळसही येतो. दुपारच्या जेवणाआधीची सक्रियता आणि नंतरही सक्रियता यातही फरक दिसतो. पण असं का होत असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का?
हे आहे कारण?
(Image Credit : Verywell Health)
जेवण केल्यावर झोप येण्याचं कारण पचनतंत्राशी संबंधित आहे. जेव्हा आपल्या शरीरात पचनक्रिया सुरू होते तेव्हा पचन अंगांना अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज असते. अन्न पचवण्यासाठी त्यांना अतिरिक्त एंजाइमचा स्त्राव करावा लागतो. ही गरज रक्तातून भागवली जाते. अशा स्थितीत रक्तप्रवाह पचन अंगांकडे अधिक वाढतो. यावेळी मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो. मेंदूमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्याने मेंदू कमी क्रियाशील होतो. ज्यामुळे थकवा आणि आळस येतो. त्यामुळे झोपही येऊ लागते.
सकाळी जास्त क्रियाशील असतो मेंदू
(Image Credit : Freepik)
जर झोपेचा संबंध हा पचन तंत्राशी आहे तर स्वाभाविकपणे असाही प्रश्न उभा राहत की, नाश्ता केल्यावर झोप का येत नाही? खरंतर नाश्ता ज्यावेळी केला जातो. त्यावेळी आपला मेंदू फार क्रियाशील असतो. मेंदू एका मोठ्या झोपेनंतर आणि आरामानंतर सक्रिय झालेला असतो. पण दुपारच्या जेवणापर्यंत मेंदूची ऊर्जा आधीच्या तुलनेत अधिक खर्च झालेली असते. अशावेळी ऑक्सिजन कमी झाल्याने मेंदू काम करण्यासाठी लगेच तयार होऊ शकत नाही.
काय करावे?
(Image Credit : Vie de Chateaux)
जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करता आणि दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला झोप येण्याची समस्या असेल तर प्रयत्न करा की, दुपारच्या जेवणात कमीत कमी कॅलरी असाव्यात. जास्त कॅलरी असलेला आहार घेतल्याने जास्त झोप येते. डीप फ्राय आणि हेवी फूड पचवण्याला पचन तंत्राला फार मेहनत करावी लागते. त्यामुळे प्रयत्न करा की, जे खाल ते फार तळलेलं आणि मसालेदार असू नये.