खूप दुःख होऊनही लोकांना रडायला येत नाही? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 01:32 PM2019-12-20T13:32:36+5:302019-12-20T13:41:13+5:30

कदाचित तुम्ही ऐकलं असेल काही लोक हे खूप दुःखी असतात किंवा त्यांच्या आयुष्यात काहीतरी गंभीर समस्या उद्भवत असते.

Know why do some people cannot cry | खूप दुःख होऊनही लोकांना रडायला येत नाही? जाणून घ्या कारण

खूप दुःख होऊनही लोकांना रडायला येत नाही? जाणून घ्या कारण

googlenewsNext

(image credit- catholiccem.com)

तुम्ही कदाचीत ऐकलं असेल काही लोकं हे खूप दुःखी असतात किंवा त्यांच्या आयुष्यात काहीतरी गंभीर समस्या उद्भवत असते. तसंच कोणाची नोकरी गेलेली असते. कोणाला पैश्याचं तर कोणाला घर चालवण्याचं टेन्शन असतं. आयुष्यात कोणतीही समस्या असो काही लोकांना रडायलाच येत नाही. किंबहूना रडावसं वाटत असून रडू शकत नाहीत.

(image credit- the gardens.com)

जर कोणाला रडायला येत नसेल तर असं मुळीच समजू नका की त्या व्यक्तीला  काही गंभीर आजार आहे. त्यांच्या भावना काही काळानंतर कोणत्या ना कोणत्या मार्गामुळे नक्कीच बाहेर पडतात. असं झाल्यानंतर त्यांना खूप चांगलं वाटतं. मनाचा भार हलका होतो.

(image credit- INC.COM)

लोकांच्या न रडण्यामागे काही कारणं असतात. काही लोक रडत नाहीत कारण त्यांच्या ऑटो इम्यून सिस्टिममध्ये समस्या निर्माण झालेली असते. Sjogren’s Syndrome  त्यांना असू शकतो. या सिड्रोममध्ये लॅक्रीमल ग्रंथी सुकतात. त्यांमुळे त्या लोकांना अश्रू येत नाहीत. व्यक्तीतील नकारात्मक विचार कमी करणे हा नैराश्य घालवण्याचा मुख्य उपचार ठरतो. त्यासाठी त्या व्यक्तीच्या परिवारातील किंवा जवळच्या माणसांनी नैराश्याचे मूळ कारण समजून घेऊन उपचार केले तर हे अधिक सुसह्य होऊ शकते.

एका रिसर्च रिपोर्टनुसार काही लोक ( Emotional Exposure ) भावनीक गोष्टींपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे असे लोक आपल्या भाव-भावना मनातच दाबून ठेवतात. कोणाशीही आपल्या भावना शेअर करायची त्यांची इच्छा नसते. अशा लोकांना  अनेकदा ताण- तणावाचा सर्वाधीक सामना करावा लागतो. कारण ज्या लोकांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रडाव लागतं. अशा लोकांच्या तुलनेत ज्यांना रडूच येत नाही त्यांना मानसिक आजार  होण्याचा धोका असतो. 

Web Title: Know why do some people cannot cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.