भारतीय परंपरेत हाताने जेवण करण्याला इतकं महत्त्व का? जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 11:57 AM2019-04-06T11:57:52+5:302019-04-06T12:01:45+5:30
जेव्हा आपण प्रसाद घेतो तेव्हा सामान्यपणे दोन्ही एकत्र पुढे करतो, एखाद्या आनंदी क्षणी दिली जाणारी मिठाई सुद्धा हातानेच घेतली जाते.
(Image Credit : TripSavvy)
जेव्हा आपण प्रसाद घेतो तेव्हा सामान्यपणे दोन्ही एकत्र पुढे करतो, एखाद्या आनंदी क्षणी दिली जाणारी मिठाई सुद्धा हातानेच घेतली जाते. भारतीय परंपरांमध्ये चमचे किंवा फोर्कऐवजी हाताने जेवण करणेच चांगले मानले आहे. हे आरोग्याच्या दृष्टीनेही चांगलं मानलं जातं. पण चमच्याने जेवण करण्याऐवजी हाताने जेवण करणे चांगलं कसं हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊ याचे फायदे.....
पंचतत्त्व आणि एनर्जी लेव्हल
(Image Credit : CoreWalking)
तज्ज्ञ सांगतात की, आपण सगळेच पाच तत्वांपासून तयार झाले आहोत, याला जीवन ऊर्जा सुद्धा म्हटले जाते. हे पाच तत्त्व आपल्यासोबत असतात. यातील कोणतही एक तत्त्व कमी झालं तर आपल्यासाठी आजाराचं कारण ठरतं. हाताने जेवण केल्याने शरीर निरोगी राहण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे आपण जेव्हा जेवण करतो, तेव्हा या सर्व तत्त्वांना एकत्र करतो. ज्यामुळे जेवण ऊर्जादायी होतं. आणि ते आपल्या शरीराची ऊर्जा संतुलित ठेवतं.
तृप्तीचा अनुभव
(Image Credit : Hellodo)
विज्ञान आणि नव्या शोधाच्या भाषेत याला माइंडफुल इटिंग म्हटलं जातं. ज्याला भारतीय परंपरेनुसार, भूक आणि जेवणाचं सामंजस्य म्हटलं जातं. यालाच तृप्ती असं म्हणतात. जेव्हा आपण काही खातो तेव्हा आपल्याला हे माहीत असतं की, ते आपल्या तोंडात जाणार आहे. याला माइंडफुल इटिंग सुद्धा म्हणतात. हे चमच्याने खाण्यापेक्षा जास्त आरोग्यदायी आहे. माइंडफुल इटिंगचे अनेक फायदे असतात, याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याने जेवणाचे पोषक तत्त्व वाढतात. तसेच याने पचनक्रियाही सुधारते.
गरम-थंडबाबत सजगता
(Image Credit : developmentnews.in)
तोंडातील सेंसेज हे हाताच्या तुलनेत अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे तोंड हे हातापेक्षा जास्त जळतं. जेव्हा आपण हाताने खातो तेव्हा जेवणाचं तापमान म्हणजे ते किती गरम आहे किंवा थंड आहे हे आपल्या हाताला कळतं. त्यानंतर तोंडापर्यंत जातं. हाताने जेवण करण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे आपली जिभ जळणार नाही.
पचनक्रिया सुधारते
स्पर्श आपल्या शरीराचा सर्वात प्रभावशाली अनुभव असतो. जेव्हा आपण हाताने जेवण करतो तेव्हा आपला मेंदू आपल्या पोटाला संकेत पाठवतो की, आपण जेवण करणार आहोत. त्यामुळे पोट आपण खाल्लेलं अन्न पचन करण्यासाठी तयार होतं. याने पचनक्रिया चांगली राहते. तसेच खाण्यातही लक्ष लागतं.