...म्हणून झोपेतून उठल्यावर मोबाइलचा वापर करणं कटाक्षाने टाळावं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 05:00 PM2019-06-12T17:00:14+5:302019-06-12T17:03:51+5:30

सकाळी मोबाइलवर गुड मॉर्निंग मेसेज, दिवसभर मोबाइलवर चॅटिंग किंव सर्फिंग आणि पुन्हा रात्री गुड नाईट विशपर्यंत तुम्हीही मोबाईलसोबत असता का? असं करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण असं केल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

Know why the mobile phone should not be seen in the first hour of the day mobile phone hazards | ...म्हणून झोपेतून उठल्यावर मोबाइलचा वापर करणं कटाक्षाने टाळावं

...म्हणून झोपेतून उठल्यावर मोबाइलचा वापर करणं कटाक्षाने टाळावं

googlenewsNext

(Image Credit : Freepik)

सकाळी मोबाइलवर गुड मॉर्निंग मेसेज, दिवसभर मोबाइलवर चॅटिंग किंव सर्फिंग आणि पुन्हा रात्री गुड नाईट विशपर्यंत तुम्हीही मोबाईलसोबत असता का? असं करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण असं केल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. तुमच्या दिवसाचा पहिला तास म्हणजेच, तुम्ही सकाळी उठल्यापासून एका तासाचा वेळ तुम्हाला दिवसभरासाठी एनर्जी देतो. पण याच वेळात मोबाईल वापरून तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ वाया घालवत आहात.

तणाव वाढतो

सकाळच्यावेळी कॉर्टिसोल हार्मोन म्हणजेच, तणाव देणाऱ्या हार्मोन्सचा स्तर कमी होतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपण फ्रेश फिल करतो.परंतु जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर मोबाईल डोळ्यासमोर ठेवतो. त्यावेळी अनेक अनावश्यक तणाव येतात. जे शरीर आणि मेंदू यांच्यातील सामान्य प्रक्रियांना बाधित करतात. 

डोकं आणि मानेमध्ये वेदना होणं 

डोकेदुखी आणि मानेच्या दुखण्यांच्या सातत्याने येणाऱ्या आकड्यांमध्ये दिसून येणारं सर्वात कॉमन कारण म्हणजे, गॅजेट्सचा जास्त वापर होय. तरूणाई गॅजेट्चा वापर गरजेपेक्षा जास्त करत आहे आणि बराच वेळासाठी एकाच पोझिशनमध्ये बसून करत आहेत. 'रिपिटेटिव इंजरी' होण्याची शक्यता वाढते. 20 ते 40 वर्षांच्या व्यक्तींमध्ये मणक्याशी निगडीत समस्या आणखी वाढतात. रिपिटेटिव इंजरी स्ट्रेस इन्जरीला (आरएसआय) सतत एकाच प्रकारची गतिशीलता आणि ओवर-यूजमुळे मसल्स आणि वेन्सचं कारण बनतात. या प्रॉब्लेम्सना ओवरयूज सिंड्रोम, वर्क रिलेटेड अपर लिंब डिसॉर्डरच्या रूपात ओळखलं जातं. 

मणक्याचं हाडंही होतं प्रभावित 

बऱ्याच वेळापर्यंत गॅझेट्सचा वापर केल्याने मणक्यावर प्रेशर येतं. यामुळे लिगामेंटमध्ये स्प्रेनचा धोका वाढतो. अशावेळी मसल्स हार्ड होऊ लागतात आणि डिस्कमध्ये प्रॉब्लेम्स होण्याचा धोका वाढतो. जास्तीत जास्त लोक 40वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. परंतु त्यांना स्पाइनच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये रिपिटेटिव्ह स्ट्रेस इन्जरी सर्वात जास्त आणि साधारण आहेत. 

हे उपाय ट्राय करा :

  • मोबाईलला आपल्या बेडरूममधून बाहेर ठेवा. 
  • नाश्त्याच्या टेबलवरही मोबाईलचा वापर करणं टाळा. 
  • रात्री इंटरनेट ऑफ करून झोपा आणि सकाळी उठल्यावरही एक तासभर ऑन करू नका.
  • मित्रांना समजवा की, तुम्ही यावेळेत मोबाईलचा वापर करत नाही. त्यामुळे जास्त महत्त्वाचं असेल तरच मेसेज करा. अन्यथा करू नका. 
  • स्वतःसाठी तयार केलेले नियम कटाक्षाने पाळा. कारण याचा थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो.

 
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Know why the mobile phone should not be seen in the first hour of the day mobile phone hazards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.