लग्नाआधी प्री-मॅरिटल चेकअप गरजेचं का असतं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 10:29 AM2019-04-19T10:29:21+5:302019-04-19T10:35:17+5:30

नुकतीच मलायका अरोरा आणि अर्जून कपूर हे प्रीमॅरिटल चेकअप करण्यासाठी पोहोचले होते. अनेकांना याबाबत प्रश्न पडलेले असतात.

know why premarital checkup is important before marriage | लग्नाआधी प्री-मॅरिटल चेकअप गरजेचं का असतं? 

लग्नाआधी प्री-मॅरिटल चेकअप गरजेचं का असतं? 

Next

(Image Credit : Bridestory.com)

बॉलिवूड सेलिब्रिटी मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जून कपूर लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार रंगली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जातं. नुकतीच मलायका अरोरा आणि अर्जून कपूर हे प्री-मॅरिटल चेकअप करण्यासाठी पोहोचले होते. अनेकांना याबाबत प्रश्न पडलेले असतात. प्रीमॅरिटल चेकअप म्हणजे काय? यात काय केलं जातं? अनेक गैरसमजही याबाबत असतात. त्यामुळे नेमकं हे चेकअप काय असतं हे जाणून घेऊया.

(Image Credit : amarujala.com)

मीडिया रिपोर्टनुसार, कपल प्रीमॅरिटल चेकअपसाठी गेलं होतं. अनेक कपल्ससाठी ही एक स्टॅन्डर्ड प्रोसिजर आहे. ज्या कपल्सना लग्न करायचं असतं त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, सुखी वैवाहिक जीवनासाठी ही टेस्ट का गरजेची आहे. 

(Image Credit : amarujala.com)

प्रीमॅरिटल चेकअप का?

अनेकांमध्ये असा गैरसमज असतो की, प्रीमॅरिटल चेकअपमध्ये व्हर्जिनीटी टेस्टही केली जाते. पण असं काही नसतं. या टेस्टचा उद्देश हे जाणूण घेणं असतं की, तुम्ही शारीरिक रुपाने लग्नासाठी किती तयार आहात. यात काही वेगवेगळ्या टेस्टचा समावेश असतो. या सर्व टेस्ट एकत्र करुन प्रीमॅरिटल चेकअप पूर्ण होतं. 

(Image Credit : lystospray.com)

ब्लड ग्रुप टेस्ट

जर मुलगा-मुलगी दोघेही एखाच आरएच (RH) फॅक्टरचे असतील तर चांगलं असतं. प्रेगनन्सीवेळी बाळ आणि आईचा वेगवेगळा RH फॅक्टर असल्याने अडचणी येऊ शकतात. 

इन्फर्टिलिटी स्क्रीनिंग

ही टेस्ट जास्त लोक करतात. त्यांना वाटत असतं की, काही कमतरला राहिली तर त्यांच्या पुढील आयुष्यात अडचणी येऊ शकतात. अचानक काहीतरी कळेल आणि धक्का बसेल, यापेक्षा येणाऱ्या परिस्थितीसाठी स्वत:ला तयार ठेवू शकाल. इन्फर्टिलिटी स्क्रीनिंगबाबत हा भ्रम असतो की, ही टेस्ट केवळ मुलींसाठीच असते. पण ही टेस्ट मुलगा आणि मुलगी दोघांनाही करावी लागते. मुलींमध्ये  Reproductive Hormones जसे की, FSH, LH, Prolactin आणि PCOS टेस्ट केली जाते. हे चेकअप ब्लड टेस्ट आणि अल्ट्रासाउंडने केली जाते. तर मुलांना इन्फर्टिलिटी स्क्रीनिंगसाठी  Sperm Sample द्यावं लागतं. 

(Image Credit : Weddingku)

एचआयव्ही / एड्स

अर्थातय या आजाराचं नाव ऐकताच लोक अस्वस्थ होतात. हे दोन्ही आजार जीवघेणे आहेत. विषय जेव्हा संपूर्ण आयुष्य एकत्र सोबत जगण्याचा येतो, तेव्हा चांगलं होईल की, दोन्ही व्यक्तींनी सहमतीने चांगल्या जीवनासाठी ही टेस्ट करावी.

आणखी काही टेस्ट

यात आणखीही काही इतर आजारांच्या टेस्ट केल्या जातात. जसे की, हार्ट डिजीज, डायबिटीज, लिव्हर, ब्लड-प्रेशर इत्यादी. हे आजार कधीही होऊ शकतात, पण योग्यवेळी याची माहिती मिळाली तर दोन्ही व्यक्ती एकमेकांची योग्य काळजी घेऊ शकतात. 

कपल चेकअप

ही एकमेकांमध्ये ताळमेळ वाढवण्यासाठी केली जाणारी एक सायकॉलॉजिकल टेस्ट आहे. ही टेस्ट ऑनलाइन टेस्टसारखी असते, ज्यात तुम्हाला तुमच्या साथीदाराची साथ द्यायची असते. याने तुमच्या रिलेशनशिपच्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी माहिती होतात. ही टेस्ट एका Questionnaire स्वरुपात असते. हा सबमिट केल्यावर तुम्हाला १२ ते १५ पानांचा रिपोर्ट मिळेल. यातून दोन्ही व्यक्ती त्यांच्यातील कमतरता जाणूण घेऊन नातं अधिक चांगलं करु शकतात.

 

Web Title: know why premarital checkup is important before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.