गोळ्यांच्या पाकिटावरील लाल रंगाच्या रेषेचा काय असतो अर्थ? खरेदी करताना ठेवा हे लक्षात..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 04:47 PM2019-08-15T16:47:28+5:302019-08-15T16:56:40+5:30
अनेकदा लोक थोडे आजारी पडले, ताप, सर्दी-खोकला झाला तर डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकल स्टोरमध्ये जाऊन कशाचाही विचार न करता औषधे खरेदी करतात.
अनेकदा लोक थोडे आजारी पडले, ताप, सर्दी-खोकला झाला तर डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकल स्टोरमध्ये जाऊन कशाचाही विचार न करता औषधे खरेदी करतात. काही वेळा या औषधांनी आराम मिळतो सुद्धा, पण काही वेळा याचे गंभीर परिणामही भोगावे लागतात. तुम्ही कधी लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की, गोळ्यांच्या स्ट्रीपवर लाल रंगाची रेष असते. पण याचा अर्थ काय होतो हे माहीत आहे का? नाही ना? चला जाणून घेऊन या लाल रेषेचा अर्थ....
(Image Credit : mentalfloss.com)
लाल रंगाच्या या रेषेबाबत डॉक्टरांना चांगलं माहीत असतं. पण सर्वसामान्य लोकांना याची काहीच माहिती नसते. अशात लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध मेडिकलमधून घेतात आणि नंतर त्यांना समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे औषधांची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
(Image Credit : Social Media)
गोळ्यांच्या स्ट्रीपवर असलेल्या लाल रंगाच्या रेषेचा अर्थ असा होतो की, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ना हे औषध विकलं जाऊ शकत ना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करता येत. अॅंटी-बायोटिक औषधांचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर रोखण्यासाठी गोळ्यांच्या स्ट्रीपवर ही लाल रंगाची रेष काढलेली असते.
(Image Credit : Social Media)
लाल रंगाच्या रेषेशिवाय औषधांच्या स्ट्रीपवर आणखीही बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. ज्यांबाबत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही गोळ्यांच्या पाकिटांवर Rx असं लिहिलेलं असतं, ज्याचा अर्थ असा होतो की, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं.
(Image Credit : Social Media)
तर औषधांच्या ज्या पाकिटांवर NRx लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा होतो की, हे औषध घेण्याचा सल्ला फक्त तेच डॉक्टर देऊ शकतात ज्यांना नशेच्या औषधांचं लायसन्स असतं.
(Image Credit : Sharechat.com)
काही औषधांच्या पाकिटांवर XRx लिहिलेलं असतं आणि याचा अर्थ होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांकडूनच घेतलं जाऊ शकतं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये खरेदी करू शकत नाहीत. भलेही डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली असेल.