चारचौघात गॅस पास करण्यास घाबरता का? असं करणं पडू शकतं महागात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 04:11 PM2024-02-08T16:11:06+5:302024-02-08T16:11:30+5:30

Farting Issue : गॅसमुळे पोट फुगतं, सोबतच काही गॅस सर्कुसेशनमध्ये पुन्हा येतो आणि तुमच्या श्वासाच्या माध्यमातून बाहेर येतो. 

Know why trying to stop fart or stomach gas is harmful for your health | चारचौघात गॅस पास करण्यास घाबरता का? असं करणं पडू शकतं महागात...

चारचौघात गॅस पास करण्यास घाबरता का? असं करणं पडू शकतं महागात...

Farting Issue : शरीरातील गॅस पास करणे एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण अनेकजण हे मान्यच करत नाहीत की, त्यांनी हे केलंय. या नैसर्गिक गोष्टीला शरमेची बाब करुन ठेवलंय. भलेही तुम्ही या गोष्टीला गंमतीत घेत असाल पण तुम्ही दररोज सरासरी अर्धा लिटर गॅस फार्टच्या माध्यामातून बाहेर टाकत असता. 

जर तुम्हाला असे करण्यात लाज वाटत असेल किंवा दुसऱ्यांसमोर तुम्ही गॅस रोखून धरण्याचा प्रयत्न करत असाल तर याचे फार गंभीर दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. एक्सपर्टनुसार, जर तुम्ही गॅस रोखून ठेवत असाल तर गॅस तुमच्या शरीरात फिरु लागतो आणि दुसऱ्याच जागेतून बाहेर निघतो. 

ऑस्ट्रेलियाचे न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स प्रोफेसर क्लॅअर कोलिन्स यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही फार्ट रोखता तेव्हा काय होतं. जेव्हा तुम्हाला जाणवतं की, पोटात गॅस आहे आणि बाहेर येण्याच्या तयारीत आहे तर एखाद्या अशा ठिकाणावर जावे जिथे तुम्हाला गॅस पास करण्यास अडचण होणार नाही. तुमच्या पचनक्रियेसाठी हे योग्य ठरेल. गॅसमुळे पोट फुगतं, सोबतच काही गॅस सर्कुलेशनमध्ये पुन्हा येतो आणि तुमच्या श्वासाच्या माध्यमातून बाहेर येतो.

डायजेशन बिघडतं

गॅस रोखल्याने डायजेशन प्रोसेसवर प्रभाव पडतो. एक्सपर्टनुसार, गॅस रोखण्याच्या प्रयत्नात पोटात ब्लोटिंगची समस्या होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्याही होऊ शकते किंवा व्यक्तीची टेस्ट घेण्याची क्षमताही नष्ट होऊ शकते. तसेच गॅस रोखून ठेवल्याने शरीरात इतरही अनेक समस्या होतात.

कोलन कॅन्सरचा धोका

गॅस रोखून ठेवल्याने पोटाचा सगळ्यात प्रभावित होणारा भाग म्हणजे कोलन. गॅस पास केल्याने गॅससोबत शरीरातून अनेक केमिकल्सही गॅस बनून बाहेर निघतात. हे केमिकल्स आपल्या शरीरासाठी घातक असतात. अशात गॅस रोखल्याने तुम्हाला कोलन कॅन्सरचाही धोका होऊ शकतो.

या गोष्टीही माहीत असाव्या

- जर तुम्हाला माहीत नसेल की, गॅस पोटात येतो कुठून? आपण जे अन्न खातो त्याची पचनक्रिया झाल्यावर त्यातून काही गॅस निघतो आणि हा गॅस तुम्ही फार्टच्या माध्यमातून बाहेर काढता.

- फार्ट करत असताना आवाज होणं हे तुमच्या शरीरातील गॅसचं प्रमाण, त्याची इंटेसिटी आणि तुमच्या बॉडी पॉश्चरवर अवलंबून असतं. 

- फार्टमधून दुर्गंधी येण्याचं कारण म्हणजे आपण जे खातो त्यात सल्फर असतं. पचनप्रक्रियेत या सल्फरपासून हायड्रोजन सल्फाइड गॅस तयार होतो आणि याचाच घाण वास येतो. जर तुमच्या फार्टमधून फारच घाण वास येत असेल तर तुम्हाला तुमच्या  पचनक्रियेवर लक्ष द्यायला हवं. 

-  अनेकदा असं होतं की, जेव्हा आपण गॅस पास करतो तेव्हा घाण वास येत नाही. कारण ही ती हवा असते जी श्वास घेत असताना फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेली असते. 

Web Title: Know why trying to stop fart or stomach gas is harmful for your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.