फ्लश करताना टॉयलेटच झाकण बंद करत नाही का? मग हे वाचाच...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 12:37 PM2024-02-16T12:37:51+5:302024-02-16T12:38:32+5:30
बरेच लोक टॉयलेट फ्लश करताना त्याचं झाकण उघडंच ठेवतात. पण हे असं करणं आरोग्यासाठी खूप नुकसानकारक ठरू शकतं.
आता बऱ्याच लोकांच्या घरांमध्ये साध्या टॉयलेट सीटसोबत कमोडही असतो. पण कमोडचा वापर करताना बरेच लोक अशा काही चुका करतात ज्या आपल्यासाठी चांगल्याच महागात पडू शकतात. बरेच लोक टॉयलेट फ्लश करताना त्याचं झाकण उघडंच ठेवतात. पण हे असं करणं आरोग्यासाठी खूप नुकसानकारक ठरू शकतं.
डेली मेल रिपोर्टनुसार, कोलोराडो बोल्ड विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांनी यावर एक रिसर्च केला. यातून असं आढळून आलं की, फ्लशिंग करतेवळी टॉयलेटचं झाकण उघडं ठेवल्याने अनेक घातक बॅक्टेरिया हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. त्यावेळी टॉयलेट हवेत एक प्रकारचं जेट तयार करतं जे कमोडपासून पाच फूट उंचीपर्यंत कण घेऊन जातं. या कणांमध्ये रोगाणु, व्हायरस आणि बॅक्टेरिया सामिल असतात. जे केवळ 8 सेकंदात तुमच्यापर्यंत पोहोचतात. जर तुम्हाला इन्फेक्शनपासून बचाव करायचा असेल तर झाकण बंद करूनच फ्लश करावं.
वैज्ञानिकांनी सांगितलं की, हे तरल थेंब सामान्यपणे डोळ्यांनी दिसत नाहीत. ते बघण्यासाठी तुम्हाला लेजरचा वापर करावा लागेल. यात अनेक घातक बॅक्टेरिया असतात. हे कण 6.6 फूट प्रति सेकंदाच्या गतीने बाहेर निघतात आणि 1.5 मीटरपर्यंत वर पोहोचतात. हे कण भिंतींवर जाऊन चिकटतात. तर हलके कण काही मिनिटे हवेत लटकून राहतात. ते नाकावाटे फुप्फुसांपर्यंत पोहोचतात.