मोठी माणसं सांगतात रात्रीच्यावेळी नखं कापू नयेत, जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 03:55 PM2022-03-04T15:55:27+5:302022-03-04T18:57:01+5:30
नखं कापण्याची योग्य पद्धत आणि वेळही जाणून (Do not cut your nails at night) घेऊ.
घरातील वडीलधारी मंडळी रात्री नखं कापू नयेत (not cut nails), असं सांगत असतात. रात्री नखं का कापू नयेत? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. पण या प्रश्नाचं योग्य उत्तर फारच कमी लोकांना माहीत असतं. चला, या प्रश्नाच्या नेमक्या उत्तरासह नखं कापण्याची योग्य पद्धत आणि वेळही जाणून (Do not cut your nails at night) घेऊ.
नखं कापण्याची योग्य वेळ कोणती?
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशनच्या मते, मानवी नखं केरॅटिनपासून बनलेली असतात. म्हणूनच, आंघोळ केल्यावर नखं कापणं सर्वोत्तम मानलं जातं. कारण, नखं पाण्यात किंवा साबणाच्या पाण्यात भिजल्यानं अगदी सहज कापली जातात. पण रात्रीच्या वेळी जेव्हा आपण ती कापतो, तेव्हा ती बराच काळ पाण्याच्या संपर्कात न आलेली नसतात. त्यामुळं त्यांना कापणं कठीण होतं. त्यामुळं कधी कधी नखं कापताना काही त्रास होतो आणि ती खराब होण्याचा धोकाही वाढतो.
रात्री नखं न कापण्यामागचं आणखी एक कारण
रात्री नखं कापू नयेत, या सल्ल्यामागील आणखी एक कारण म्हणजे जुन्या काळी लोकांकडे नेल कटर उपलब्ध नव्हती. त्या काळी लोक चाकूनं किंवा धारदार हत्यारानं नखं कापत असत. त्यावेळी वीज नव्हती. म्हणूनच पूर्वी लोक रात्रीच्या अंधारात नखं कापण्यास मनाई करत असत. परंतु, काळाच्या ओघात लोकांनी त्याला अंधश्रद्धेशी जोडलं आहे. काही लोक अजूनही त्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्या मुलांनाही ते पाळण्यास सांगतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारची शारीरिक हानी टाळता येईल.
नखं कापण्यापूर्वी थोडी ओलसर करा
नखे कापण्याचा योग्य मार्ग म्हणजे नखं आधी थोड्याशा तेलानं किंवा पाण्यात ओलसर करणं. यामुळं तुमची नखं मऊ होतील आणि तुम्ही त्यांना व्यवस्थित कापू शकाल. लक्षात ठेवा की, नखं कापल्यानंतर त्यांना मॉइश्चराइझ नक्की करा. तसंच, नखे कापल्यानंतर हात धुवा. नंतर ते कोरडे होऊ द्या आणि त्यानंतर मॉइश्चरायझर किंवा तेल लावा. यामुळं नखं नेहमीच सुंदर राहतील.
कुठेही बसून नखं कापू नका
अनेकदा लोक त्यांच्या सोयीनुसार कुठंही बसून नखं कापू लागतात. ही खूप वाईट सवय आहे. नखं कापण्यासाठी बोर्डचा वापर करा किंवा सपाट आणि मजबूत पृष्ठभागावर हात ठेवून सावकाशपणे नखं कापा. नखं कापून झाल्यानंतर तो बोर्ड उचला आणि नखं डस्टबिनमध्ये टाका. कपडे किंवा फर्निचरसारख्या वस्तूंवर कधीही नखं कापू नका.
क्युटिकल्स कापू नका
क्युटिकल्स (Cuticles) नखांच्या मुळांचं संरक्षण करतात. पण जेव्हा तुम्ही तुमची क्यूटिकल कापता, तेव्हा बॅक्टेरिया आणि इतर जंतू शरीरात प्रवेश करू लागतात. यामुळं, नखामध्ये संसर्ग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो, जो काहीवेळा बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो. म्हणून, तुमच्या क्युटिकल्स कापणं किंवा त्यांना आणखी मागेपर्यंत नेणं टाळा.