बेडवर बसून जेवण करता? डॉक्टरांनी सांगितलेलं वाचल्यावर तुम्ही चुकूनही असं करणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 03:48 PM2023-06-14T15:48:13+5:302023-06-14T15:48:30+5:30
24 वर्षीय एका व्यक्तीला बेडवर बसून जेवण्याची सवय होती. अनेकदा अन्नाचे काही कण बेडवर सोडत होता. वरून वरून स्वच्छता होत होती, पण बेडच्या आत काही कण तसेच राहत होते.
लहानपणापासून आपण घरातील मोठ्यांकडून ऐकत असतो की, जेवण नेहमी स्वच्छ आणि शांत ठिकाणी बसून करावं. खाली मांडी घालून बसून जेवण्याला आयुर्वेदातही फार महत्व देण्यात आलं आहे. अशात शास्त्रांनुसार, बेडवर बसून जेवण केल्यास अन्नाचा अपमानही होतो. कारण बेड ही झोपण्याची जागा आहे. तरीही बरेच लोक बेडवर बसून जेवण करतात. त्यांना ते आरामदायक वाटतं. पण एका डॉक्टरने याबाबत एक इशारा दिला आहे.
सिंगापूरचे डॉक्टर सॅम्युअल यांनी टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आणि याचं पूर्ण कारण सांगितलं. ते म्हणाले की, नुकतंच मला एका घटनेबाबत समजलं. 24 वर्षीय एका व्यक्तीला बेडवर बसून जेवण्याची सवय होती. अनेकदा अन्नाचे काही कण बेडवर सोडत होता. वरून वरून स्वच्छता होत होती, पण बेडच्या आत काही कण तसेच राहत होते. झालं असं की, एक दिवस त्याच्या कानात जोरात वेदना झाली. इतकी वेदना की, त्याला असह्य झालं होतं. कुटुंबिय त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी चेक केलं तर कानाच्या आत 10 पिल्लांसह कॉकरोज म्हणजे झुरळ फिरत होते. जे त्याच्या कानाला आतून कुरतडत होते. जे बघून डॉक्टरही हैराण झाले.
घाबरण्याऐवजी सॅमुअल यांनी लोकांना सूचना केली की, ही एक रेअर घटना आहे. पण कुणासोबतही असं होऊ शकतं. जगातील अनेक देशातून अशा घटना समोर आल्या आहेत. अनेकदा तर कानांचा पडदाही फाटला आणि व्यक्ती बहिरे झाले. एंटोमोलॉजिस्ट कोबी शाल यांनी 'द वर्ज' ला सांगितलं की, झुरळ किंवा कोणत्याही कीटकासाठी मनुष्यांचे कान सगळ्यात सुरक्षित जागा आहे. कारण तुम्ही तिथे त्यांना सहजपणे मारू शकत नाहीत. दुसरं असं की, त्यांना हे ठिकाण एखाद्या खोप्यासारखं दिसतं.
तुम्हाला वाचून धक्का बसेल की, कानातून येणारा गंध कीटकांना आकर्षित करतो. ईअर वॅक्स म्हणजे कानातील मळाचा जो गंध असतो, तो ब्रेड, पनीर आणि बीअरमध्ये आढळणाऱ्या फॅटी अॅसिडमधून निघतो. झुरळ तुम्ही गाढ झोपेत असताना सहजपणे तुमच्या कानात शिरू शकतात.
त्यामुळे जेव्हाही तुम्हाला काही असहज जाणवलं तर सगळ्यात आधी कानात ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब टाका. यात हायड्रोजन पॅराक्साइड असतं. ज्यामुळे कीटक बाहेर येतात. पण हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टिकटॉक यूजर्स डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकून हैराण झाले आहेत. अशात बेडवर जेवणं बंद केलं तर नुकसान टळू शकतं.