कोकम ज्यूस आहे श्रद्धा कपूरच्या फिटनेसचं गुपित, घरी कसं कराल तयार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 11:08 AM2018-10-02T11:08:58+5:302018-10-02T11:10:30+5:30
बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये फिटनेसची क्रेझ आधीच्या तुलनेत आता फार वाढली आहे. आणि त्यांना त्यांचे चाहते फिटनेससाठी फॉलो करतात. बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुंदर दिसण्यासोबतच फिटही आहे.
बॉलिवू़ड अभिनेत्रींमध्ये फिटनेसची क्रेझ आधीच्या तुलनेत आता फार वाढली आहे. आणि त्यांना त्यांचे चाहते फिटनेससाठी फॉलो करतात. बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुंदर दिसण्यासोबतच फिटही आहे. फिटनेससाठी ती जिम तर जातेच सोबतच डाएटवरही खास लक्ष देते.
श्रद्धाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या फिटनेसचं गुपितही सांगितलं होतं. ती फिटनेससाठी कोकम ज्यूस पिते. काही दिवसांपूर्वी श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यात तिने हा ज्यूस रोज सेवन करत असल्याचं सांगितलं होतं. तिचं म्हणनं आहे की, तुम्हाला फिट आणि हिट राहण्यासाठी हा ज्यूस पिणे गरजेचे आहे.
कसा तयार कराल हा ज्यूस?
कोकम सरबत घरच्या घरी तयार करणे फार सोपे आहे. यासाठी तुम्हाला फार जास्त कशाची गरज लागत नाही. हे तयार करण्यासाठी तुम्हाला ४०० ग्रॅम कोकम आणि ४ लिटर पाण्याची गरज आहे. हे दोन्ही एकत्र उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि रोज हा ज्यूस सकाळी आणि सायंकाळी सेवन करा. रतांबी हे फळ कोकण भागात आढळतं. रातांब्यापासून तयार कोकम ज्यूसचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
कोकम ज्यूसचे फायदे
१) कोकममध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं आणि यात फार कमी कॅलरी असतात. कोकममध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेडेट फॅट अजिबात आढळत नाही. तसेच यात व्हिटॅमिन सी चं प्रमाण अधिक असतं, हे एकप्रकारे अॅंटीऑक्सिडेंटचंही काम करतं. कोकममध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि मॅगझिन हे तत्व आढळतात. याने हृदय निरोगी आणि ब्लड प्रेशरही सामान्य राहतं.
२) कोकम ज्यूसमध्ये एचसीए आढळतं जे हायपोकोलेस्ट्रॉलेमिक एजंटसारखं काम करतं. हे कॅलरीज फॅटमध्ये बदलवणाऱ्या इंजाइम्सची क्रियाशिलता कमी करतं.
३) पोट खराब झालं असल्यावर कोकम चूर्ण एक ग्लास थंड पाण्यात मिश्रित करुन सेवन करावे. याने लगेच आराम मिळू शकतो.
४) कोकम अॅंटीऑक्सिडेंट आणि अॅंटी-इनफ्लेमॅटरी एजंटसारखं काम करतं आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं. कोकममध्ये असलेलं अॅंटी-कार्सिनजेनिक तत्व गार्निकॉल, कॅन्सरच्या पेशी कमी करतं.
५) हिवाळ्यामध्ये नेहमी ओठ फाटण्याची समस्या होते. अशात कोकमचं तेल लावल्याने आराम मिळेल.