मेंदूत एक खास प्रोटीन कमी असल्याने वाढतो लठ्ठपणा - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 04:39 PM2021-10-21T16:39:34+5:302021-10-21T16:40:03+5:30
Health Tips : आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की, लठ्ठपणाचा संबंध भूकेशी असतो. ज्या व्यक्तीला जेवढी भूक लागते, तो तेवढं खातो. मग त्याचमुळे ते नंतर लठ्ठपणाचे शिकार होतात.
आजकाल लठ्ठपणा एक आजार नाही तर आजारांचं हेडक्वार्टर आहे. लठ्ठपणा शरीरात डायबिटीस, हायपरटेंशन, हार्ट डिजीज, बॅड कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्या निर्माण करतो. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की, लठ्ठपणाचा संबंध भूकेशी असतो. ज्या व्यक्तीला जेवढी भूक लागते, तो तेवढं खातो. मग त्याचमुळे ते नंतर लठ्ठपणाचे शिकार होतात.
मात्र, दैनिक जागरणमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, जपानच्या वैज्ञानिकांनी अशा प्रोटीनचा शोध घेतला आहे, जो मेंदूत भूकेसंबंधी नियमित संकेत देणे आणि मेटाबॉलिज्ममध्ये महत्वाची भूमिका बजावतो.उंदरांवर करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये आढळून आलं की, मेंदूच्या पुढच्या भागात एक्सआरएन१ नावाचं प्रोटीन कमी असल्याने उंदारांची भूक वाढली आणि ते लठ्ठ होतात.
जपानची ओआयएसटी म्हणजे ओकीनावा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट यूनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक प्रोफेसर तदाशी यामामोटो यांच्यानुसार, मूलभूतपणे लठ्ठ होण्याचं कारण जेवण करणे आणि त्यापासून उत्पन्न ऊर्जेच्या असंतुलनामुळे असतं. हा रिसर्च सायन्स मॅगझिन आयसायन्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
सध्याच्या काळात लठ्ठपणा पब्लिक हेल्थसाठी चिंतेचं एक मोठं कारण आहे. जगभरात ६५ कोटींपेक्षा अधिक वयस्क लोक लठ्ठपणाचे शिकार आहेत. वजन अत्याधिक वाढल्याने त्यासंबंधी अनेक आजार महामारीचं रूप घेतात. जसे टाइप-२ डायबिटीस इत्यादी.
रिसर्चमध्ये आढळून आलं की, उंदराच्या मेंदूच्या पुढच्या भागात न्यूरॉनची कमतरता केली तर त्यांच्या मेंदूच्या या भागात एक्सआरएन१ नावाचं प्रोटीन कमी होतं. याने शरीराचं तापमान, झोप, भूक आणि तहान नियंत्रित केली जाऊ शकते. ज्या उंदरांमध्ये हे प्रोटीन कमी आढळून आलं, त्यांनी सामान्य उंदरांच्या तुलनेत जास्त जेवण केलं.