हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जास्त फायदेशीर ठरते ही हिरवी भाजी, ब्लड शुगरही होईल कंट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 04:40 PM2022-07-30T16:40:52+5:302022-07-30T16:41:06+5:30
High Cholesterol : आज आम्ही तुम्हाला एका अशा हिरव्या भाजीबाबत सांगणार आहोत जिचं सेवन करून तुम्ही बॅड कोलेस्ट्रॉल तर दूर करूच शकता, सोबतच ब्लड शुगर लेव्हलची कंट्रोल करता येईल.
Benefits of Eating Lady Finger: चुकीची जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) वाढणं साहजिक आहे. अशात हार्ट अटॅक(Heart Attack) आणि डायबिटीसचाही Diabetes) धोका राहतो. चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही हेल्दी डाएटची निवड केली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला एका अशा हिरव्या भाजीबाबत सांगणार आहोत जिचं सेवन करून तुम्ही बॅड कोलेस्ट्रॉल तर दूर करूच शकता, सोबतच ब्लड शुगर लेव्हलची कंट्रोल करता येईल.
भेंडी खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल होईल कमी
भेंडीची भाजी तर अनेकांना आवडते. लोक वेगवेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करतात. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. त्यासोबतच यात पेक्टिनही आढळतं. ज्याच्या मदतीने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊ लागतं. यामुळे ब्लड प्रेशरही नियंत्रित राहतं. हे लक्षात ठेवा की, हाय कोलेस्ट्रॉलला अनेक आजारांचं मूळ मानलं जातं.
डायबिटीस रूग्णांना फायदेशीर
जसं की, आधीच सांगितलं भेंडीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे भेंडीने पोटासंबंधी समस्या दूर होतात आणि डायजेशनही चांगलं राहतं. भेंडी खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूकही लागत नाही. भेंडी डायबिटीसच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर असते. कारण ही हिरवी भाजी खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.
इम्यूनिटी होईल बूस्ट
कोरोना काळ सुरू झाल्यापासून इम्यूनिटी बूस्ट करण्याबाबत खूप काही केलं जात आहे, खूप काही बोललं जात आहे. अशात भेंडी तुमच्या खूप कामात येऊ शकते. जर तुम्ही या भाजीचा डेली डाएटमध्ये समावेश केला तर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.