लस्सी की ताक, उन्हाळ्यात काय पिणं जास्त फायदेशीर ठरतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 09:35 AM2024-04-27T09:35:30+5:302024-04-27T09:36:03+5:30
Lassi Vs Chaas: जेव्हा या दोनपैकी एकाच्या निवडीचा प्रश्न येतो तेव्हा लोक कन्फ्यूज होतात. पण अशावेळी आम्ही तुम्हाला या दोन्हींचे फायदे सांगणार आहोत.
Lassi Vs Chaas: उन्हाळा सुरू झाला की, मसाला ताक किंवा लस्सीचं सेवन जास्तीत जास्त लोक करतात. कारण याने त्यांना थंड वाटतं. तापत्या उन्हात या गोष्टी शरीराला आराम देतात. दह्यापासून तयार या दोन्ही टेस्टी ड्रिंक्सचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पण जेव्हा या दोनपैकी एकाच्या निवडीचा प्रश्न येतो तेव्हा लोक कन्फ्यूज होतात. पण अशावेळी आम्ही तुम्हाला या दोन्हींचे फायदे सांगणार आहोत. त्यानंतर निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.
डाइजेशन आणि इम्यूनिटीसाठी चांगलं ताक
भारताच्या वेगवेगळ्या भागात ताक जेवणातील महत्वाचा भाग मानलं जातं. दह्यात भरपूर पाणी, काळं मीठ, जिऱ्या पूड, पदीना टाकून मसाला ताक बनवलं जातं. जे पिऊन तुम्हाला फ्रेश वाटतं. या ड्रिंकने उन्हाळ्यात शरीराचं तापमान योग्य राहतं. त्यासोबत याने डायजेशन चांगलं राहतं आणि इम्यूनिटीही बूस्ट होते.
1) पचन तंत्र सुधारतं
ताकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. जे पचन तंत्रासाठी हेल्दी बॅक्टेरिया आहे. याने पचन चांगलं होतं. तुम्हाला बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो. सोबतच ब्लोटिंग, गॅस, अॅसिडिटीसारख्या समस्याही दूर होतात.
2) शरीर हायड्रेट राहतं
उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते. ताकामध्ये भरपूर पाणी असतं जे शरीराची पाण्याची गरज भागवतं. पाण्यासोबतच यात इलेक्ट्रोलाइट्सही असतात जे शरीराचा डिहायड्रेशनपासून बचाव करतात.
3) वजन कमी करतं
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ताकाचं सेवन केलं पाहिजे. कारण ताकामध्ये कॅलरी आणि फॅट कमी असतं. जे वजन कमी करण्यासाठी चांगलं मानलं जातं. तसेच याने भूक कमी होते आणि मेटाबॉलिज्म मजबूत करण्यास मदत करतं.
4) इम्यूनिटी वाढते
ताकामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन भरपूर असतात जे इम्यूनिटी सिस्टीम मजबूत करण्यास मदत करतात. याने शरीराला इन्फेक्शनसोबत लढण्याची शक्ती मिळते. ताकामध्ये पोटॅशिअम असतं जे ब्लड प्रेशर कंट्रोल करतं. तसेच याने बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते.
लस्सीमधूनही मिळतं पोषण
सामान्यपणे लस्सी घट्ट दह्यात साखर टाकून तयार केली जाते. लस्सी केवळ टेस्टी नसते तर याने पोटाला खूप आराम मिळतो. लस्सीचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात.
1) एनर्जी बूस्टर
लस्सीमध्ये भरपूर कार्बोहयड्रेट असतात. जे तुम्हाला एनर्जी देतात. जर तुम्हाला उन्हामुळे थकल्यासारखं वाटत असेल तर लस्सी पिऊन तुम्हाला एनर्जी मिळेल.
2) पोषक तत्व
लस्सीमध्ये जेवढी मलाई असते आणि जेवढी ती गोड असते तेवढेच त्यात पोषक तत्वही असतात. लस्सीमध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि प्रोबायोटिक्स इत्यादी भरपूर असतात. यात मिनरल्सही भरपूर असतात.
3) डायजेशनसाठी चांगली
दह्यापासून बनली असल्या कारणाने लस्सीमध्ये प्रोबायोटिक्स असतात. जे गट हेल्थसाठी चांगले असतात. याने तुमचं डायजेशन चांगलं होतं. अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्या दूर होतात.
ताक आणि लस्सीमधून काय निवडायचं हे तुमच्या हातात आहे. दोन्ही ड्रिंक्स तुम्हाला हायड्रेट ठेवतात आणि शक्ती देतात. पण दोन्हींच्या कॅलरीमध्ये खूप फरक आहे. 100 ग्राम ताकामध्ये 40 कॅलरी असतात तर 100 ग्राम लस्सीमध्ये 77 कॅलरी असतात.