'या' ९ कारणांमुळे दर महिन्याला पाळी यायला होतो उशीर; चांगल्या आरोग्यासाठी वेळीच माहीत करून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 12:04 PM2020-12-17T12:04:00+5:302020-12-17T12:14:22+5:30
Health Tips in Marathi : जर तुम्ही गर्भधारणेसाठी कोणतंही प्लॅनिंग करत नसाल तरीही इतर काही कारणांमुळे मासिक पाळी येण्यास उशिर होऊ शकतो.
सर्वाधिक महिलांना मासिक पाळीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. पाळी न येण्याचे सगळ्यात मोठं कारण गर्भधारणा हे असते. पण जर तुम्ही गर्भधारणेसाठी कोणतंही प्लॅनिंग करत नसाल तरीही इतर काही कारणांमुळे मासिक पाळी येण्यास उशिर होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला ९ कारणं सांगणार आहोत ज्यामुळे पाळी यायला उशिर होतो.
ताण तणाव
ताणतणावाचा वेगवेगळ्या प्रकारे शरीरावर परिणाम होतो. ताण तणावामुळे-GnRH नावाचे हार्मोनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ओव्यूलेशन उशीरा सुरू होऊन पाळी उशीरा येते. तुमच्या आयुष्यात जास्त जाण तणाव असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
आजारपण
अचानक ताप, सर्दी, खोकला येणं किंवा कोणत्याही दीर्घ आजारामुळे पीरियड्स देखील लांबू शकतात. हे तात्पुरते होते आणि एकदा आपण रोगातून बरे झाल्यावर आपली पाळी वेळेवर यायला सुरूवात होते.
दिनक्रमात बदल
वेळापत्रक बदलणे, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे, शहरातून बाहेर जाणं किंवा लग्नासाठी किंवा इतर फंक्शनसाठी आपली दिनचर्या बदलते. त्यामुळे मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होऊन पाळी उशिरा येण्याची शक्यता असते.
ब्रेस्टफीडिंग
अनेक महिला जोपर्यंत बाळाचे स्तनपान करत असतात. तोपर्यंत त्यांना नियमित पाळी येत नाही.
बर्थ कंट्रोल पिल्स
बर्थ कंट्रोल पिल्स किंवा अन्य काही औषधांमुळे मासिक पाळीची सायकल बदलते. अशी औषधं घेतल्यामुळे पाळी वेळेवर येत नाही किंवा जास्त लवकर येते अनेकदा दोन ते तीन महिने वाट पाहावी लागू शकते. अशा स्थितीत तुम्ही योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचे ठरेल.
लठ्ठपणा
लठ्ठपणा हे मासिक पाळी न येण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण आहे. महिलांना पाळी दर महिन्याला तारखेला येते. पण अचानक ३ ते ४ किलोंनी वजन वाढलं तर हार्मोनल बदलांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही. त्यासाठी रोज व्यायम करणं फायदेशीर ठरेल. शारीरिक हालचाल केल्यास, भरपूर पाणी पिल्यास शरीर निरोगी राहते. परिणामी पाळी वेळेवर येते.
हिवाळ्यात होणारा अंगदुखीचा त्रास असू शकतं कोरोनाचं लक्षणं? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
प्री मेनोपॉज
वयाच्या ३५ आणि ४० वर्षानंतर ही समस्या उद्भवू शकते. मासिक पाळी येणं थांबण्याआधी अनेक महिने पाळी अनियमित व्हायला सुरूवात होते.
वजन जास्त कमी होणं
जर तुमच्या शरीराला आवश्यक असणारे फॅट्स योग्य प्रमाणात नसतील तर अनियमित होऊ शकते. शरीराला पोषक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास मासिक पाळीच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.
'या' लोकांना सगळ्यात जास्त असतो मुत्राशयाच्या कॅन्सरचा धोका; जाणून घ्या प्रकार
थायरॉईड
गळ्यातील थायरॉईड ग्रंथी चयापचय नियंत्रित करते. शरीराच्या अनेक फंक्शन्समध्येही याची भूमिका महत्वाची असते. आपल्याला थायरॉईड संबंधित कोणतीही समस्या असल्यास मासिक पाळीवर देखील परिणाम होतो. आपल्याला थायरॉईडची समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार घ्या.