हाऽऽ हाऽऽ.. अरे, हसा की.. जगण्याच्या आनंदासाठी तरी हसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:49 PM2017-07-29T17:49:12+5:302017-07-29T17:50:48+5:30

हसणं तुमचंच नाही, तुमच्या संपर्कात आलेल्यांचंही आयुष्य बदलून टाकील

laugh and get healthy, cheerful life | हाऽऽ हाऽऽ.. अरे, हसा की.. जगण्याच्या आनंदासाठी तरी हसा

हाऽऽ हाऽऽ.. अरे, हसा की.. जगण्याच्या आनंदासाठी तरी हसा

ठळक मुद्देताण कमी होईलब्लड प्रेशरचा त्रास कमी होईलहृदयविकाराची शक्यता दूर पळेलनिगेटिव्हिटी कमी होईलआव्हानं पेलण्यासाठी सज्ज व्हांल

- मयूर पठाडे

कारणं अनेक आहेत, पण आपल्या आयुष्यातून हसणं खूपच कमी झालं आहे. सांगा, खळखळून, मनमोकळं हसणारी अशी किती माणसं आपल्याल आजकाल दिसतात. जवळपास नाहीच. आपल्या आयुष्यातलं हसणं कमी झालं आणि आपल्या आयुष्यातला आनंदही कमी झाला!...
आपल्या आयुष्यातला हा आनंद आपल्याला परत मिळवयचा, तर हे खखळून हसणं पुन्हा आपल्या आयुष्यात यायला हवं.
त्यासाठी अगदी प्रयत्नपूर्वक काही गोष्टी करायलाही हव्यात. ज्यामुळे हसता येईल, हसवेल अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला हव्यात. अगदी काहीच नाही, तर लाफ्टर क्लबही जॉइन करता येईल.

हसण्यानं होणारे फायदे-


१- ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांचा त्रास हसण्यामुळे कमी होऊ शकतो. इतकंच काय, हार्ट अटॅकची शक्यताही कमी होऊ शकते.
२- आपल्याला रोज कसले ना कसले ताण असतात. या ताणातच आपण जगत असतो. खळखळून हसण्यानं आपली स्ट्रेस हार्मोन लेव्हल कमी होते.
३- हसण्यामुळे आपल्या हृदयाची क्षमताही वाढते आणि अर्थातच त्यामुळे हृदयाचे विकार आपल्यापासून लांब राहतात.
४- आपल्या शरीरातील टी-सेल्स वाढण्यास मदत होते. टी-सेल्समुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे हेल्दी लाईफ जगण्यासाठी हसणं हा एक महत्त्वाचा उपाय होऊ शकतो.
५- हसण्यामुळे आपल्या शरीरातील एन्डॉर्फिनचं प्रमाण वाढतं. एन्डॉर्फिन हे एक नॅचरल पेनकिलर आहे. आपली दुखणी स्वत:हून बरं करणारं शरीरातलंच हे एक रामबाण औषध आहे.
६- तुम्ही बघा, जो जास्त हसतो, तो नेहमी प्रसन्न असतो आणि त्यामुळे त्याची स्मरणशक्तीही उत्तम असते.
७- हसण्यामुळे आपल्यातली निगेटीव्हिटी कमी होते आणि कुठलीही आव्हानं पेलण्यासाठी आपण सज्ज राहतो. आपला मूड त्यामुळे आनंदी राहतो आणि जीवनाकडे बघण्याची दृष्टी सकारात्मक होते.
८- हसणं आणि क्रिएटिव्हिटी यांचा अगदी जवळचा संबंध आहे. हसणारी लोकं तुलनेनं जास्त क्रिएटिव्ह असतात हे संशोधनातून सिद्धही झालं आहे.
त्यामुळे हसा, हसत राहा, इतरांनाही हसवा आणि आपल्याप्रमाणेच आपल्या आजूबाजूचं वातावरणंही हसरं, प्रसन्न करा. ज्यातून सगळ्यांचंच आयुष्य आनंदी, समृद्ध होईल आणि प्रत्येकाला जगण्याचं बळ देताना आयुष्यात रंग भरील..
 

Web Title: laugh and get healthy, cheerful life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.