खळखळुन हसा अन् घालवा राग... वाचा लाफिंग थेरपीच्या साध्या सोप्या टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 02:30 PM2021-07-09T14:30:27+5:302021-07-09T14:31:01+5:30

यासाठी रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी हास्य थेरपीचा तुम्ही उपयोग करू शकता. हसण्याने राग चटकन दुर होतो.

Laugh out loud and don't get angry ... Read Simple Laughing Therapy Tips | खळखळुन हसा अन् घालवा राग... वाचा लाफिंग थेरपीच्या साध्या सोप्या टीप्स

खळखळुन हसा अन् घालवा राग... वाचा लाफिंग थेरपीच्या साध्या सोप्या टीप्स

Next

प्रत्येकाला राग हा येतोच. मात्र रागावर नियंत्रण ठेवणं सर्वांनाच जमतं असं नाही. काही लोक पटकन रागावतात आणि लवकर शांतही होतात. काहींचा राग मात्र लवकर शांत होणं कठीण असतं. राग अनावर झाला की त्या माणसाचा चेहरा लाल होतो, अंगाचा थरकाप उडतो, बोलण्यावर नियंत्रण राहत नाही. या सर्व गोष्टींमुळे रक्तदाबामध्ये झटकन बदल होतो. ज्याच्या परिणाम तुमच्या शरीर आणि मन स्वास्थावर होऊ शकतो. शिवाय रागाच्या भरात अशी माणसं नको ते निर्णय घेतात. ज्यामुळे शेवटी त्याच व्यक्तीचं नुकसान होऊ शकतं. अती रागामुळे माणसं नैराश्याच्या अधीन गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. यासाठी रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी हास्य थेरपीचा तुम्ही उपयोग करू शकता. हसण्याने राग चटकन दुर होतो. राग घालवण्यासाठी हास्याचा उपयोग कसा करावा हे डॉ. नेहा आनंद यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला सांगितले आहे.

एक्सप्रेशन्स बदला
तुम्हाला राग येत असेल तर तुमचे एक्सप्रेशन्स बदला. चेहऱ्यावर हास्य ठेवण्याचा प्रयत्न करा. हे करणं कठीण आहे. तुम्ही म्हणाल की राग आल्यावर हसायचे कसे तर हे तुम्हाला सवयीने जमेल.

हसण्याजोग्या गोष्टी आजूबाजूला ठेवणे
तुम्हाला राग आला असेल तेव्हा आजूबाजूला हसु येईल अशा गोष्टी ठेवा. तुम्ही लाफ्टर शो बघु शकता किंवा मित्रांसोबत फोनवर बोलू शकता. जुन्या हास्यास्पद आठवणी किंवा जोक्स आठवू शकता.

हास्यास्पद घटना आठवा
तुम्हाला राग येत असेल तर हास्यास्पद घटनांची आठवण करा. अशावेळी इतरांनी राग येणाऱ्या व्यक्तीची मस्करी करू नका. त्यामुळे जास्त राग येतो. त्याऐवजी त्याला जोक्स किंवा हास्यस्पद घटना सांगा.

हास्य योग करा
रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही हास्य योग करू शकता. यासाठी रिलॅक्स पोजिशनमध्ये बसा आणि जोरजोरात हसा. बघा रागावर नियंत्रण मिळवण्यास खुप फायदा होईल.

माईंडफुलनेस मेडिटेशन करा
रागाला आवर घालण्यासाठी माईंडफुलनेस मेडिटेशन करा. शांत बसून मेडिटेशन करताना चांगल्या आठवणी आठवा. तुमचं मन अगदी शांत होईल आणि रागावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.

Web Title: Laugh out loud and don't get angry ... Read Simple Laughing Therapy Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.