उठबशा काढून आणि जोरजोरात हसूनही कमी करु शकता वजन!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 10:37 AM2019-04-16T10:37:39+5:302019-04-16T10:44:25+5:30
ज्यांचं वजन जास्त आहे ते स्वत:ला स्लीम आणि फिट दाखवण्यासाठी फार मेहनत घेतात. वेगवेगळ्या प्रकारचे उपाय ते करतात.
ज्यांचं वजन जास्त आहे ते स्वत:ला स्लीम आणि फिट दाखवण्यासाठी फार मेहनत घेतात. वेगवेगळ्या प्रकारचे उपाय ते करतात. पण हे उपाय कुणासाठी फायदेशीर ठरतात तर कुणासाठी ठरत नाहीत. वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग, जिमिंग, वर्कआउट असं काय काय करतात. पण यासोबतच एक-दोन अशाही एक्सरसाइज आहेत ज्यांचा समावेश लाइफस्टाइलमध्ये करायला हवा. चला जाणून घेऊन त्या एक्सरसाइजबाबत ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यास होईल मदत.
उठबशा काढणे
वजन कमी करण्यासाठी उठबशा करणे सर्वात सोपा व्यायाम आणि चांगला व्यायाम आहे. याने शरीराची क्षमताही वाढते.
याला दंडक असंही म्हटलं जातं. यात कोणत्याही आधाराशिवाय बसून उभं रहायलं असतं. या व्यायामाने शरीराच्या मांसपेशी मजबूत होतात. तसेच शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं आणि चरबीही कमी होते.
(Image Credit : dailyvanity.sg)
उठबशा काढल्याने मांड्याच्या आजूबाजूला जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होते.
उठबशा काढल्याने पोटाच्या आजूबाजूची चरबी कमी होण्यासोबतच काही दिवसात शरीराचं वजनही कमी होतं
सुरुवातीला केवळ ५ उठबशा काढा. तुम्हाला काही त्रास होत नसेल तर संख्या वाढवा.
एक आठवड्यापर्यंत असेच करा आणि नंतर उठबशा काढण्याची संख्या वाढवा. पण हे करत असताना बॅलन्स ठेवणे गरजेचं आहे.
जोरात हसणे
जोरजोरात हसणे हा हेल्दी राहण्यासाठी फार चांगला व्यायाम मानला जातो. नेहमी जोरजोरात हसल्यानेही तुम्ही वजन कमी करु शकता.
हसणे ही सुद्धा एक कला आहे. व्यायाम करताना तुम्हाला हसायचं असेल तर मोकळ्या हवेत तुम्हाला हे करावं लागेल. सरळ उभे राहून, दोन्ही हात वर करुन, मोठा श्वास घेऊन जोरात हसायचं आहे.
(Image Credit : India Tribune)
ग्रुपमध्येही हसू शकता. तुम्हाला तुम्ही व्यायाम करत आहात हा विचार करुन हसायचं नाहीये. तर तुम्ही खूप खूश आहात हा म्हणून तुम्ही हसताय असा विचार करायचा आहे. निरोगी राहण्याचा आणि वजन कमी करण्याचा हा सोपा उपाय मानला जातो. सकारात्मक विचारासाठीही तुम्ही जोरजोरात हसायला पाहिजे.